Goat And Child Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ फार धक्कादायक तर काही फार भावनिक असतात.तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरणं अवघड होते. सध्या एका बकरीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकला बकरीची मुद्दाम खोड काढताना दिसतोय, यानंतर बकरी त्याला असा काही धडा शिकवते की पाहून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला वारंवार बकरीला त्रास देतोय, कधी तिला हात लावतोय, कधी नाचून दाखवतोय, कधी शिंग खेचण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला बकरी काहीच प्रतिक्रिया देत नाही, सगळं काही निमुटपणे सहन करत राहते. पण कालांतराने ती चिडते आणि थेट प्रत्युत्तर देते. बकरी रागात चिमुकल्याला शिंगांनी जोरात ढकलते, यात चिमुकला कोणत्या तरी वस्तूवर जाऊन पडतो आणि जोरजोरात रडू लागतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरण आता अवघड होत आहे.

बकरी आणि चिमुकल्याचा हा मजेदार व्हिडिओ erose.edit’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी लाईकही केला आहे. इतकेच नाही तर लोक व्हिडिओचा आनंद घेत आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. काही जण म्हणतायत की, हे दृश्य पाहून मजा आली. काही जण म्हणतायत की, बकरीने एक युक्ती खेळली.