Viral Video of Waterfall Accident : पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक जातात पण योग्य काळजी न घेतल्याने अनेकजण आपला जीव गमावतात. पावसाळा सुरू झाल्यापासून अशा अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे नागरिकांना वारंवार पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले जात आहे पण त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. दरम्यान सध्या धबधब्यावरील अपघाताचा नवा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहील. सध्या सतत सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी धोकादायकरित्या वाढली आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पर्यटकांना अशा ठिकाणी भेट न देण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. अनेकदा डोंगरमाथ्यावर जास्त पाऊस झाल्यास धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढतो ज्याबरोबर लोक वाहून गेल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. असे असतानाही लोक धबधब्यांवर जाऊन स्वत::बरोबर इतरांचा जीव धोक्यात टाकतात. सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहून शकता की कुटुंब धबधब्याच्या ठिकाणी अडकल्याचे दिसत आहे. अचानक धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने आई पाण्याच्या प्रवाहाच्या एका बाजूला आणि वडील आणि मुलगी दुसर्या बाजूला अडकले आहेत. दरम्यान, पाण्याचा प्रवाह इतरा जोरात आहे की कोणतीही व्यक्ती सहज वाहून जाईल. पाण्याच्या प्रवाहाच्या दुसर्या बाजूला जाण्याच्या नादात महिलेबरोबर जे घडायला नको तेच घडते. व्हिडीओमध्ये दिसते की, महिला उडी मारून पाण्याचा प्रवाह ओलांडण्याचा प्रयत्न करते, तिचा पती हात पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न करतो पण महिलेचा तोल जातो आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे किंवा महिलेचा जीव वाचला की याबाबत माहिती मिळालेली नाही पण धबधब्याच्या ठिकाणी जाऊ आपला जीव धोक्यात का टाकू नये हाच बोध यातून मिळतो आहे. हेही वाचा - Viral Video: भरदिवसा मुंबईच्या रस्त्यावर टॉवेल गुंडाळून फिरताना दिसली मॉडेल; काय आहे Viral Videoचे सत्य? व्हिडिओ इंस्टाग्रामवर vaishnodevi_maa_2000 आणि sudhir.sain नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मुलीची आई वाहून गेली, देवाच्या कृपेने ती ठीक असावी, कृपया तुम्ही अशी चूक करू नका."तसेच व्हिडीओवर मजकूर लिहिलेला दिसत आहे ज्यामध्ये लिहिले आहे की, "का जातात अशा ठिकाणी लोक, बिचारी आई वाहून गेली जर ( आई-वडील) दोघंही वाहून गेले असते तर त्या चिमुकलीकडे कोण बघणार?" हेही वाचा – “जपून जा रे, पुढे धोका आहे!”, धबधब्यावर भिजताना तरुण दगडांवरून घसरला अन् थेट खाली…. Video Viral व्हायरल व्हिडीओवर कमेंट करून एकाने सांगितले की, पूर्ण व्हिडिओ बघा आई वाचते. एकाने लिहिले की, अत्यंत वाईट, अशा ठिकाणी जायलाच नाही पाहिजे, पावसाळ्यात हे खूप धोकादायक ठरते.