scorecardresearch

Premium

लहानपण देगा देवा.. मित्रांना बैल बनवून लावली बैलगाडा शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एकाने त्याच्या दोन मित्रांना चक्क बैल बनवून बैलगाडा शर्यत लावली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण येऊ शकते.

childhood video
लहानपण देगा देवा.. मित्रांना बैल बनवून लावली बैलगाडा शर्यत (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर अनेक लहन मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक तीन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकाने त्याच्या दोन मित्रांना चक्क बैल बनवून बैलगाडा शर्यत लावली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण येऊ शकते.
लहानपण देगा देवा..असं म्हणतात ते खरंय. लहापणीच्या आठवणी जगावेगळ्या असतात आणि लहानपणीचे मित्र हे आयुष्यात नेहमीच लक्षात राहतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला तिन मित्रांची सुंदर मैत्री दिसत आहे.

या तिघांनी लाकडी काठ्यांपासून एक बैलगाडी तयार केलेली दिसत आहे. या तिघांपैकी दोन बैल बनले असून एक जण बैल हाकलताना दिसत आहे. त्यांची ही खोटी खोटी बैलगाडा शर्यत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की या तिघांचाही पुढे तोल जातो आणि ते खाली पडतात. शर्यतप्रेमी मित्रांचा हा व्हिडीओ अनेकांना त्यांच्या बालपणीची आठवण करुन देईल.

Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
marathon, medical tests, running, precautions, Health, marathi news,
Health Special: मॅरेथॉन धावताय? तर या टेस्ट केल्या आहेत का? (भाग १)
friendship will never end an old man keep friendship video viral of farmers home friendship in old age
Video : ही दोस्ती तुटायची नाय! म्हातारपणातही आजोबा जपताहेत मैत्री, शेतकरी राजाच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
by watching the child performance on stage brings tears in father eyes
वडिलांचे प्रेम! पोराला स्टेजवर पाहून वडिलांचे अश्रू अनावर, ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या वडिलांची येईल आठवण

हेही वाचा : तरुणींना लाजवेल असा आजीचा उत्साह, आजीने केला पंजाबी डान्स; व्हिडीओ पाहा

hichya_govala_kokan_dakhva या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शर्यतप्रेमी….स्वर्गाहुन सुंदर आपलं कोकण.येवा कोंकण आपलोच असा” या कॅप्शनवरुन कळते की हा व्हिडीओ कोकणातला असावा.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फुल्ल राडा” तर एका युजरने लिहिलेय, “नाद एकच एकच, एकच फक्त बैलगाडा शर्यत” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाद ओ नाद” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Childhood video three friends playing a bullock cart race where two friends turned into bulls and one became farmer funny video goes viral on social media farmers life ndj

First published on: 01-12-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×