Dance Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान चिमुकले डान्स करताना दिसतात तर कधी वृद्ध लोकं थिरकताना दिसतात. डान्सचा आनंद लुटणारे अनेक व्हिडीओ दर दिवशी सोशल मीडियावर चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही चिमुकले ढोल ताशाच्या तालावर बॉलीवूड स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ढोल आणि ताशा ही वाद्ये सणासुदीला आणि अनेक शुभ कार्यात आवर्जून वाजवली जातात. ढोल ताशा वाजवण्याची पद्धत विशेषत: महाराष्ट्रात आणि इतर राज्यात सुद्धा दिसून येते. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा चिमुकले ढोल ताशाच्या तालावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children dance so gracefully by watching their expression and dance style you will forget salman khan akshay kumar and govinda video goes viral ndj
First published on: 07-02-2024 at 16:47 IST