VIRAL VIDEO : दारूसाठी कायपण! रस्त्यावर उलटला ट्रक, तर लहान मुलं सुद्धा बाटल्या घेऊन पळाले | children started picking up liquor bottles robbing from truck shocking video goes viral prp 93 | Loksatta

VIRAL VIDEO : दारूसाठी कायपण! रस्त्यावर उलटला ट्रक, तर लहान मुलं सुद्धा बाटल्या घेऊन पळाले

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर दारूच्या बाटल्याच बाटल्या दिसून येत असून दारू लुटण्यासाठी लहान मुलांची पळापळ सुरू असलेली दिसून येतेय. हे चित्र फारच धक्कादायक आहे.

VIRAL VIDEO : दारूसाठी कायपण! रस्त्यावर उलटला ट्रक, तर लहान मुलं सुद्धा बाटल्या घेऊन पळाले
(Photo: Instagram/ deepakkulasted)

दारू शरीराला हानिकारक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली अनेकांनी पाहिलेली आहेत. पण तरी देखील लोक दारू पितातच. कितीही काही झालं तरी दारू कोणी सोडत नाही. अनेक गावांमध्ये, जिल्ह्यात, दारूबंदीची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण एवढे सगळे असताना काही दारू शौकीनांना दारूचा मोह काही आवरत नाही. मग दारूसाठी समोर आलेली कोणतीच संधी ते सोडत नाहीत. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर दारूच्या बाटल्याच बाटल्या दिसून येत असून दारू लुटण्यासाठी लहान मुलांची पळापळ सुरू असलेली दिसून येतेय. हे चित्र फारच धक्कादायक आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून दारूच्या बाटल्या घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाला. रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा ढिग पडल्याची बातमी आजुबाजूच्या परिसरात समजली आणि फुटकची दारु पळवण्यासाठी लोकांनी इकडे गर्दी केली. या भागातील तळीरामांची चांगलीच चंगळ झाली. लोकांनी दारुच्या बाटल्या पळवण्यासाठी तोबा गर्दी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे लहान लहान मुलंही या गर्दीत सहभागी झाले होते.

आणखी वाचा : अजबच! प्रेग्नंन्सीच्या नवव्या महिन्यातही ‘बेबी बंप’ दिसलं नाही; हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल

इतकंच काय तर पाण्यात सुद्धा दारूच्या बाटल्या पडल्या असतील म्हणून तिथे शोधाशोध करण्यासाठी वृद्धांसह लहान मुलांची धडपड या व्हिडीओमध्ये दिसली. ट्रॅक पलटी झाल्यावर त्यातील दारूच्या बाटल्या खाली पडल्याचे पाहून तळीरामांनी चांगलीच संधी साधली. पण त्यांच्यासोबत लहान मुलांचा सहभाग पाहून सर्वांनाच धक्क बसला. एक मुलगा तर चक्क चार-पाच दारूच्या बाटल्या घेऊन जाताना दिसला.

आणखी वाचा : कित्ती गोड! आई आणि बाळामधल्या या गोंडस क्षणाचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पोलिसच विना हेल्मेट! मग वरिष्ठांनी अशी अद्दल घडवली…, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण झाले आहेत. ‘deepakkulasted’ नावाच्या युजरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओवर लोकांनी आपला संतापही व्यक्त केला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, “चालकाला मदत करण्याऐवजी लोक दारू लुटण्यात गुंतले आहेत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2022 at 14:25 IST
Next Story
सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्नी जेवणात फक्त मॅगीच खायला देते म्हणून पतीचा घटस्फोटासाठी अर्ज; घटस्फोटही मिळाला