Children’s day 2024 Viral Video : दरवर्षी १४ नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. जवाहरलाल नेहरूंचा लहान मुले खूप आवडत. मुले त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणायचे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा लहान मुलांना समर्पित केला जातो.
खरं तर बालपण हे खूप सुंदर असते. लहानपणी आपल्याला त्याचे महत्त्व कळत नाही पण मोठे झाल्यावर बालपण हवेहवेसे वाटते. “लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।” या ओळी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील.
सोशल मीडियावर बालदिनानिमित्त अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस आठवतील.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला लहान चिमुकल्यांचे अनेक सुंदर क्षण टिपलेले दिसून येईल. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला एक चिमुकला कुत्र्याला घेऊन रस्ता ओलांडताना दिसत आहे. त्यानंतर एक चिमुकली वडीलांच्या कडेवर दिसत आहे. त्यानंतर एका कार्यक्रमात काही लहान मुले खाली बसून टाळ्या वाजवताना दिसत आहे. एक चिमुकला यमाच्या वेषभूषेत दिसत आहे. काही चिमुकले पाळण्यावर झोका घेताना दिसत आहे. बहीण भाऊ वडीलांच्या दुचाकीवर बसून जात आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : ट्रम्प मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद मिळालेले अब्जाधीश विवेक रामास्वामी कोण आहेत? त्यांचे भारताशी काय नाते? वाचा सविस्तर

u

एका चिमुकल्याने साडीचा पाळणा तयार केला आहे आणि त्यावर झोका घेत आहे. एक चिमुकला लहान मुलांची दुचाकी तर दुसरी चिमुकली लहान मुलांची चार चाकी चालवताना दिसत आहे. काही लहान मुले यात्रेत फिरताना दिसत आहे तर काही चिमुकले देवीच्या विसर्जनाच्या दिवशी देवीजवळ बसलेले दिसत आहे. काही चिमुकल्या मुली गरबा खेळत आहे तर काही चिमुकले यात्रेत झोका गाडीवर बसलेले दिसत आहे. एक चिमुकला आईसह देवीचे दर्शन घेताना दिसत आहे. तर एक वडील चिमुकल्या मुलीला खेळवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांचे बालपण आठवेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

explorewith_nishant या इन्स्टाग्राम अकाउंट हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बालपणीची जादू आठवताना..”

हेही वाचा : VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी माझ्यातल्या लहान मुलाला मिस करतो जेव्हा मी कोणत्याही कारणाने आनंदी व्हायचो.” तर एका युजरने लिहिलेय, “दिल तो अभी भी बच्चा है” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून अचानक जाणवले की आता पण लहान नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader