Emotional video: “प्राण्यांवर प्रेम केलं तर ते तुमच्यावरही प्रेम करतात” जगात प्राण्यांची आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी करणारे अनेक लोक आहेत. माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि ते सुद्धा भावूक होऊन रडतात सुद्धा…आपल्या जवळच्या माणसापासून आपण जेव्हा दूर जातो तेव्हाच्या वेदना या सहन करण्याच्या पलिकडे जातात. तेव्हा आपण ढसाढसा रडून मोकळे होतो. सोबतच आपल्याला काय त्रास होतोय, हे जवळच्या माणसांना सांगून आपण व्यक्त सुद्धा होतो. पण प्राण्याचं तसं नसतं. त्यांना बोलता येत नसल्याने ते माणसांप्रमाणे भडाभडा बोलून व्यक्त होत नाही. पण वेदना त्यांना होत असतात. असाच एक चिपांझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, हो… प्राण्यांनाही माया असते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चिंपांझी एका तरुणाच्या मिठीत धावत येत असल्याचे दिसत आहे. ज्याने त्याला काही वर्षांपूर्वी वाचवले होते. हा व्हिडिओ प्राणीप्रेमींसाठी भावूक करणारा आहे. आजकाल माणसं एखाद्यानं केलेली मदत सहज विसरून जातात मात्र पाणी कधीच विसरत नाहीत याचाच प्रत्यय हा व्हिडीओ बघून येतो.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिंपांझी आणि त्याच्या मित्राचे पुनर्मिलन दाखवले आहे, ज्याने त्याला वर्षांपूर्वी वाचवले होते. नदी ओलांडताना तो माणूस हातात फळे आणि केळी घेऊन चिंपांझीच्या जवळ जातो. पाण्याच्या मध्यभागी, चिंपांझी आणि तो माणूस भेटतो. चिंपांझी मोठ्या स्मितहास्यासह त्या माणसाचे हात हातात घेतो आणि त्याला मिठी मारतो. दोघांमधील प्रेमळ बंध स्पष्टपणे दिसून येतो कारण ते वेगळे होण्यापूर्वी तीनदा मिठी मारतात. व्हिडिओच्या शेवटी चिंपांझी त्याच्यासाठी आणलेली फळे घेतो आणि नदीच्या पलीकडे असलेल्या त्याच्या समुदायाकडे निघून जातो.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे, ज्याला पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जात असे. या व्हिडिओला आधीच सुमारे अर्धा दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. या जबरदस्त क्षणावर प्राणीप्रेमींनी कमेंट सेक्शनमध्ये एकत्र येऊन हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या आहेत.