Why China Most Generous Boss Fires Employee : कर्मचारी आणि बॉस हा आजच्या कॉर्पोरेट जगातील असे समीकरण आहे जे कधीच कोणाला टाळता येत नाही अन् सहनही होत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपला बॉस खडूस वाटतो. चांगला बॉस असे काही नसते असेही अनेकांना वाटते. कर्मचाऱ्यांना बॉसकडून एकच अपेक्षा असते की, त्याने आपल्या कामाची कदर केली पाहिजे आणि त्याचा योग्य मोबदला दिला पाहिजे. पण इतका उदार बॉस क्वचितच कोणी असेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अशाच एका उदार बॉसची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. नाही नाही तो बॉस भारतात नव्हे तर चीनमधील आहे.
सोशल मिडियावर सध्या चीनच्या सर्वात उदार( generous) बॉस म्हणून ओळखला जाणारा व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे.
हेनान कुआंगशान क्रेन कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष कुई पेईजुन यांनी, एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचे उघड केल्यानंतर ऑनलाइन चर्चेला सुरुवात झाली. तुम्हाला हे वाचून वाटेल की, हा व्यक्ती सर्वात उदार बॉस कसा असू शकतो. सर्व बॉस सारखेच असतात. थांबा….तुम्ही आणखी अंदाज बांधण्याआधी नक्की काय घडले ते जाणून घ्या.
त्याचे झाले असे की, चीनमधील सर्वात उदार बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने त्याच्या कर्मचाऱ्याला कामावरून काढले खरे पण त्यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या कर्मचाऱ्याने त्याच्या लग्नात त्याच्या आईलाच बोलावले नव्हते म्हणून या बॉसने त्याला कामावरून काढले होते.
हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसला असेल. तुम्ही असा विचार करत असाल की आपल्याच आईला आपल्याच लग्नात न बोलवणे हे खरंच वाईट आणि चुकीचे आहे पण ही त्या कर्मचाऱ्याची वैयक्तिक गोष्ट आहे त्यामुळे बॉसने त्याला कामावरून का काढले असेल. …..सांगत…सांगतो… नक्की काय घडले ते सांगतो. पण त्या आधी तुमचे मन घट्ट करा कारण पुढे जे घडले ते ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो. तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही पण,”या कर्मचाऱ्याला स्वत:च्या आईची लाज वाटत होती. त्याला ती सुंदर दिसत नाही असे वाटत होते; म्हणून त्याने आपल्या लग्नात आपल्याच आईला बोलावले नाही.” हे कृत्य कोणत्याही आईच्या जिव्हारी लागणारे आहे याची कल्पनाही करू शकत नाही पण माणूस म्हणूनही हे कृत्य अत्यंत संतापजनक आहे. म्हणूनच त्याच्या बॉसने त्याला कामावरून काढू टाकले.
नक्की काय घडले ?
स्थानिक वृत्तसंस्था ‘दाशियांग न्यूज’नुसार, हेनान कुआंगशान क्रेन कंपनीने २१ जुलै रोजी उन्हाळी इंटर्नशिप आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. या उपक्रमात एकूण ३३१ कर्मचाऱ्यांच्या मुलांनी नावनोंदणी केली. उद्घाटन समारंभात बोलताना, अध्यक्ष कुई पेईजुन यांनी कुटुंब आणि पालकांच्या महत्त्वावर भर दिला.”पालकांचा आदर करणे हा “एक सभ्य व्यक्ती बनण्याचा पाया” आहे.” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात त्यांनी आपल्याच एका कर्मचाऱ्याची गोष्टही सांगितली ज्याला त्याने कामावरून काढून टाकले होते. कारण त्याला कळले होते की, त्या माणसाने आपल्या आईला लग्नाला बोलावले नव्हते कारण त्याला तिच्या दिसण्याची लाज वाटत होती.
त्या घटनेची आठवण सांगताना कुई म्हणाले की, त्यांनी त्या कर्मचाऱ्याला विचारले: “तू दोन वर्षांचा असतानाच तुझे वडील वारले, आणि तू तुझ्या आईशी असा वागतोस?” नंतर त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले.
कर्मचाऱ्याने गुडघ टेकवून माफी मागितली तरी…
तो कर्मचारी नंतर कुईच्या कार्यालयात परत आला आणि माफी मागण्यासाठी त्याच्यासमोर गुडघे टेकल्याचे वृत्त आहे. त्याने सांगितले की त्याला दुसरी नोकरी मिळू शकली नाही, परंतु कुई आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्याला परत कामावर घेतले नाही. “माझ्या मनात तुझ्याबद्दल आदर नाही. मला माफ कर, पण तुला जावेच लागेल,” असे कुई म्हणाले.
त्या कर्मचाऱ्याच्या आई सेवानिवृत्त झाल्यानंतर, कुईने तिला कंपनीच्या लॉजिस्टिक्स विभागात नोकरीची ऑफर दिली होती असे म्हटले जाते. या पदासाठी तिच्या आधीच्या नोकरीइतकाच पगार होता असे वृत्त आहे. तिच्या म्हातारपणी तिचा मुलगा तिची काळजी घेऊ शकणार नाही, अशी चिंता त्याला वाटत असल्याचे त्याने सांगितले. त्या महिलेने या घटनेबद्दल कोणतेही सार्वजनिक विधान केलेले नाही.
ही बातमी लवकरच चीनच्या मुख्य भूमीवरील सोशल मीडियावर व्हायरल झाली, जिथे तिला २४ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कुई यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यांच्या मते, ही बडतर्फी कंपनीच्या मूल्यांशी सुसंगत होती आणि त्यांनी याला एक योग्य व्यवस्थापकीय निर्णय मानले.
अध्यक्ष कुई पेईजुन यांना का मानले जाते सर्वात उदार बॉस
कुई पेईजुन यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वर्षाअखेरीस बोनस म्हणून १८० दशलक्ष युआन (२६ दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे २३७ कोटी रुपये) वाटले. या कृतीमुळे त्यांना “चीनचे सर्वात उदार बॉस” हे टोपणनाव मिळाले.
पेईजुन म्हणाले की, गृहकर्ज आणि इतर कर्जांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या तरुण कर्मचाऱ्यांना मोठ्या बोनसमुळे मदत होऊ शकते. ही त्यांची एकमेव उदार कृती नाही . साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका अहवालानुसार, त्यांनी गेल्या १२ वर्षांत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील ४,८०० हून अधिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ३५ दशलक्ष युआनचे अनुदान वितरित केले आहे.
अध्यक्ष कुई पेईजुन यांचा निर्णय हा नैतिक मूल्य आणि पालकांचा आदराबाबत होता. कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा बोनस देऊन त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करणारा आणि आईचा अनादर करणाऱ्या कर्मचाऱ्याला थेट घरचा रस्ता दाखवणारा हा बॉस आज जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. “कामातील कौशल्यापेक्षा माणसातील नैतिकता आणि संस्कार अधिक महत्त्वाचे असतात,” हे कुई पेईजुन यांनी आजच्या कॉर्पोरेट जगाला दिलेला संदेश आहे.
