परदेशातील लोकांना भारतीय संस्कृतीसह बॉलीवूड गाण्यांचे खास आकर्षण आहे हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर एका चिनी मुलीचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या चिनी मुलीने चक्क बॉलीवूड गाण्यावर अफलातून डान्स केला आहे जो सर्वांचे मन जिंकत आहे.

व्हायरल व्हिडीओ चायनामधील आहे. चायनामध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी व्हॉगरने हा व्हिडीओ त्याच्या asifinchina इंस्टाग्रामावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, एका कार्यक्रमातील आहे जिथे उपस्थित सर्व लोक चीनी असल्याचे दिसते. दरम्यान एक चिनी मुलगी भारतीय वेशभूषा परिधान करून नाचताना दिसत आहे. चिमुकलीने काळ्या रंगाचा शरारा घातला आहे. एवढंच नाही तर तिने काळ्या रंगाची टिकली देखील लावलेली आहे. चिनी लोकांच्या मैफिलीत ही चिमुकली बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे.

धूम ताना’वर परफेक्ट परफॉर्मन्स (Perfect Performance on Dhoom Taana)

asifinchina ने तिचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ‘धूम ताना’ या गाण्यावर नाचत आहे. ‘धूम ताना’ हे ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ७० च्या दशकाची रेट्रो स्टाईल दर्शवणारे एक अतिशय गाजलेले बॉलिवूड गाणे आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या गाण्यात सुंदर नृत्य केले होते. चिमुकलीला पाहून कोणालाही वाटणार नाही की ही चिमुकली चिनी आहे. या चिमुकलीने दीपिका पदुकोणपेक्षा भारी डान्स केला आहे. नाचताना ती अगदी प्रोफेशन बॉलीवूड डान्सर सारखी नाचत आहे.

चिकणी चमेली’वर दमदार डान्स (Powerful Dance on Chikni Chameli)

तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ही चिमुकली चिकणी चमेली गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. ‘चिकणी चमेली’ हे ‘अग्निपथ’ चित्रपटातील कतरिना कैफवर चित्रित झालेले एक अतिशय लोकप्रिय आणि गाजलेले मराठी लावणीवर आधारित हिंदी आयटम साँग आहे. या गाण्यावर अभिनेत्री कतरिना कैफ हिने मोहक नृत्य सादर केले होते. पण या चिमुकलीने थेट कतरिनाला टक्कर दिली आहे. चिमुकलीचा डान्स पाहून सर्वजण थक्क झाले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (Netizens Reactions)

दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनाच तिचा डान्स खूप आवडला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिचे तोंडभरून कौतुक केले.

एकाने कमेंट केली की, ही कतरिना पेक्षा चांगले नाचत आहे.

दुसऱ्याने कमेंट केली की, हीदीपिका पदुकोणला टक्कर देत आहे.

तिसऱ्याने कमेंट केली की, तिच्या डान्स बरोबर तिचे हावभाव देखील अप्रतिम आहे.