Man Spends 6 Hours in Office Toilet: आपण सर्वजण ऑफिसमध्ये जातो जेणेकरून आपण व्यवस्थित काम करू शकू. काम केल्यानंतरच आपल्याला पगार मिळतो. काम करताना आपण २-३ छोटे ब्रेक घेत असतो. पण चीनमधील एका व्यक्तीला कामादरम्यान ब्रेक घेणे महागात पडलं आहे. कामादरम्यान हा व्यक्ती अर्धा -पाऊन तास नव्हे तर जवळपास ६ तासांचा ब्रेक घेत असे ज्यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. त्यानंतर या व्यक्तीने कोर्टात धाव घेतली. हा व्यक्ती ६ तासाचा ब्रेक का घेत होता याचा खुलासा कोर्टात झाला. कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. जाणून घ्या काय संपूर्ण प्रकरण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑफिसच्या वेळेत ६ तास टॉयलेटमध्ये घालवत असे कर्मचारी

साऊथ चायनाच्या मॉर्निंग पोस्ट दिलेल्या माहितीनुसार,एक व्यक्ती ज्याचे आडनाव वांग असे आहे तो दिवसातील ६ तास टॉयलेट ब्रेक घेत होता. रोज ऑफिसच्या वेळेत थोड्या थोड्यावेळाने तो टॉयलेटमध्ये जाऊन बसत असे. सुरुवातीला त्याचा हा प्रकार व्यवस्थित सुरू होतं पण जेव्हा कंपनीच्या हे लक्षात आलं त्यानंतर मात्र त्याला नोकरी गमवावी लागली.

हेही वाचा – रशियाविरुद्ध लढणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांना लागलं ऑस्कर विजेत्या ‘नाटू- नाटू’चं वेड! पहा डान्सचा जबरदस्त Video!

कंपनीने कामावरून टाकले काढून

तर झालं असं की २००६मध्ये वांग हा या कंपनीत जॉईन झाला. वांग या कंपनीत कॉन्ट्रक्टवर काम करत होता. डिसेंबर २०१४मध्ये त्याला गुदद्वारासंबंधीचा त्रास झाला ज्यावर त्याने उपचार घेतले. उपचारानंतर वांग ऑफिसच्या वेळेत रोज ६ तास टॉयलेटमध्ये घालवत असते. अशा परिस्थितीमध्ये कंपनीने त्याचे कॉन्टॅक्ट रद्द केले.

हेही वाचा – बसनंतर आता आली डबल डेकर सायकल! व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, ”आजोबा जुगाड जबरदस्त आहे पण…”

कोर्टात धाव घेतली पण…

हताश होत वांग कोर्टात गेला आणि पण तिथेही त्याची डाळ शिजली नाही. कोर्टाने वांग याला चूकीचे ठरवत कंपनीची भूमिका योग्य असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. चीनमधील सोशल मीडियावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्ती केल्या आहेत

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese man fired for spending 6 hours of office shift time in toilet reason out in the court snk
First published on: 03-06-2023 at 13:33 IST