मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी दिलं जातंय कोंबडीच्या रक्ताचं इंजेक्शन

चीनमधील लोकांच्या खाण्याच्या विचित्र सवयी जगजाहीर असतानाच आणखी एक नव्या संकल्पनेनं खळबळ माजली आहे. लहान मुलांना ऑल राउंडर करण्यासाठी चक्क कोंबडीचं रक्त दिलं जातंय.

chinese-children-will-made-smart-through-chicken-parenting
(Photo: pixabay)

कोरोना महामारीच्या काळात चीनमध्ये एक विचित्र प्रयोग सुरू करण्याची तयारी केली जातेय. आपल्या मुलांना सुपर किड्स बनवण्यासाठी ‘चिकन बेबी’ ही संकल्पना स्वीकारण्याची तयारी चीन करत आहे. चीनमध्ये मुलांना जबरदस्तीने कोंबडीचे रक्त दिलं जातंय. असं केल्यानं त्यांची मुले आयुष्यात कधीही अपयशी होणार नाहीत आणि ते कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहतील अशी आशा इथल्या पालकांना आहे. या प्रयोगामुळे इथल्या मुलांवर वाईट परिणामही दिसू लागले आहेत आणि इथल्या मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. एवढंच नव्हे तर बहुतेक शाळकरी मुलांनी त्यांचे डोळे गमावले आहेत. ही माहिती शी जिनपिंग यांच्या सरकारच्या एजन्सीजमार्फत देण्यात आली आहे.

‘चिकन बेबी’ या संकल्पनेत पालक आपल्या मुलांना कोंबडीच्या रक्ताचे इंजेक्शन देतात. द सिंगापूर पोस्टने दिलेल्या बातमीनुसार चीनच्या लोकांच्या खाण्याच्या विचित्र सवयींबाबत एक नवीन खळबळ उडाली आहे. कोंबडीचे रक्त हे संततीसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांवर उपचार आहे. यामध्ये वंध्यत्व, कर्करोग आणि टक्कल पडणे यासारख्या समस्या कोंबडीच्या रक्तामुळे दूर होतात, असं चीनमधील लोकांना वाटत आहे. कोंबडीच्या रक्तामुळे मुलांच्या क्रियाकलाप वाढतात, ज्यामुळे ते अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही चांगले काम करू लागतात. Supchina.com च्या अहवालात असंही म्हटलंय की, ‘चिकन बेबी’ ही संकल्पना तिथे खूप लोकप्रिय झाली आहे. विशेषत: बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझू सारख्या महानगरांमधील मध्यमवर्गीय चीनी पालक या संकल्पनेत गुंतले आहेत.

चीनमध्ये २५ टक्के किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य

सुपचिन मीडिया रिपोर्टनुसार, ‘चिकन बेबी’ या संकल्पनेमुळे मुलांमध्ये मानसिकतेचे वाईट परिणाम दिसू लागले आहेत. कारण, चीनमधील किशोरवयीन मुलांमध्ये डिहायड्रेशनची तक्रार खूप वाढली आहे. द सिंगापूर पोस्टच्या अहवालानुसार, २०१९-२० साठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य विकास अहवालात चीनमधील २५ टक्के किशोरवयीन मुले नैराश्याने ग्रस्त आहेत आणि ७.४ टक्के मुलांनी गंभीर नैराश्याची तक्रार केलीय.

चीनमध्ये बहुतांश शाळकरी मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. चीनमधील मुलांच्या मायोपियाच्या तक्रारी जगात सर्वाधिक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. इथल्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ७१ टक्के माध्यमिक शाळा आणि ८१ टक्के हायस्कूलमधील मुलं या समस्येला बळी पडली आहेत.

‘चिकन बेबी’ संकल्पना जवळजवळ अमेरिकेतल्या ‘हेलिकॉप्टर पालकत्व’ सारखी दिसून येतेय. अमेरिकन पालक असं मानतात की फक्त एक शालेय शिक्षण पुरेसे नाही, चांगले ग्रेड पुरेसे नाहीत, इतरही क्षेत्रात मुलांनी तितकेच चांगलं काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जात आहेत. यातून मुलांचं नुकसानचं होत असून या संकल्पना घातक ठरू लागल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chinese parents giving their kids chicken blood injections prp

ताज्या बातम्या