सोशल मिडियावर पाकिस्तानचा चहावाला आणि नेपाळची भाजीवाली यांना मिळालेल्या लोकप्रियेनंतर आता मिरची विकणाऱ्या चीनी गर्लने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे. चीनमधील एका छोट्या गावातील तरुणीचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चीनमध्ये मिरची विकणाऱ्या तरुणीची सोशल मिडियावर  जोरदार चर्चा सुरु आहे.

चीनमधील या तरुणीसोबत अन्य तरुणींचे फोटो देखील नेटीझन्स मोठ्या प्रमाणात पसंत करताना दिसत आहे. छोट्या गावातील या तरुणींची गावरान वेशभूषा आणि त्यांच्या सौंदर्याने नेटीझन्सना घायाळ केले आहे. या तरुणींचे सौंदर्य एखाद्या चित्रपटातील नायिकेला लाजविणारे असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटत आहेत. लोकप्रियता मिळत असणाऱ्या फोटोबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. पण यापूर्वी लोकप्रिय झालेल्या फोटोप्रमाणेच या तरुणींचीही माहिती लवकरच समोर येईल, अशी  नेटीझन्समध्ये आशा दिसून येते.

[jwplayer 7PSfWWZH]

काही दिवसांपूर्वीच नेपाळमधील भाजी विकणाऱ्या तरुणीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. #tarkariwali या हॅशटॅगच्या साहय्याने नेपाळमधील तरुणीचे दोन फोटो व्हायरल झाले होते. गंडरू पोस्ट नावाच्या वेबसाइटच्या वृत्तानुसार, या तरुणीचे लोकप्रिय झालेले फोटो गोरखा आणि चेतवन या शहरांना जोडणाऱ्या पूलावर भरणाऱ्या बाजारामधील होते. यातील एका फोटोमध्ये तरुणी हिरव्या रंगाच्या वेशभूषेत टॉमेटोची विक्री करताना ती बाजारात उभी असल्याचे दिसले होते. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती मोबाईल फोनवर बोलताना दिसत होती.
सर्वात प्रथम निळ्या डोळ्यांनी पाकिस्तानी चहावाल्यांने जगभरातून लोकप्रियता मिळवली होती.

चहावाल्या पाकिस्तानी तरुणाला  मिळालेल्या लोकप्रियेनंतर त्याचा मॉडेल लूक देखील पाहायला मिळाला होता. अर्थात नेटीझन्सच्या पसंतीने एका चहावाल्याला मॉडेलच्या पंक्तीत नेऊन बसवले होते, अशा बातम्या देखील झळकल्या होत्या. त्यामुळे सध्या व्हायरल होणाऱ्या चीनी तरुणीला देखील एक वेगळी ओळख निर्माण करण्यामध्ये नेटीझन्सची पसंती मोलाची ठरणार का? हे येणारा काळाच ठरवेल.

[jwplayer ZeWixKVH]