असं म्हणतात एक मिठी तुमच्या मोठ्या शत्रूला सुद्धा तुमचा मित्र बनवू शकते. स्वतः मुन्नाभाई एमबीबीएसने सुद्धा हेच सांगितले होते आठवतेय ना? पण अलीकडेच आपल्या एका महिला कर्मचारीला मिठी मारणे एका व्यक्तीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. चीनच्या Yueyang शहरातील Hunan province मधील एका खाजगी कंपनीत अलीकडे एक विचित्र प्रकार घडला आहे. एका सहकाऱ्याने महिलेला बोलता बोलताच अगदी घट्ट मिठी मारली. भावनेच्या आहारी त्याने मारलेली मिठी इतकी घट्ट होती की त्यामध्ये या महिलेची चक्क तीन हाडे मोडल्याचे समजत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IOL च्या रिपोर्ट्सनुसार, मिठी मारताच ही महिला वेदनेने कळवळू लागली होती. मात्र तिला चटकन काय झाले असेल याचा अंदाज आला नाही. ऑफिस मधून बाहेर पडल्यावरही तिला छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. घरी गेल्यावर तिने तेल लावून घरगुती उपाय केला. मात्र यानंतर सलग पाच तास तिला हाच त्रास होत होता. जेव्हा या वेदना तिला असहनीय झाल्या तेव्हा तिने अखेरीस हॉस्पिटल मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी या महिलेला एक्स- रे काढण्यास सांगितले ज्यात तिच्या उजव्या बाजूला दोन व डाव्या बाजूला एक अशा बरगड्यांना दुखापत झाल्याचे समजले.

16 गाढवांनी जोधपूर पोलिसांचा जीव केला हैराण.. कारण ऐकाल तर चकित व्हाल

दरम्यान, या सगळ्या परिस्थितीत तिला ऑफिसला जाणे शक्य झाले नाही, जेव्हा तिची या सहकाऱ्याशी भेट झाली तेव्हा तिने या घटनेबाबत माहिती देऊन त्याला नुकसान भरपाई देण्यास सांगितले, त्याने मात्र तिच्या मागणीला नकार दिल्याने या महिलेने थेट Yunxi कोर्टाकडे मदत मागितली. मागील पाच दिवसात आपण बरगड्यांना दुखापत होईल असे काहीही केलेले नाही आणि झालेले नुकसान हे संबंधित सहकाऱ्याने मारलेल्या मिठीमुळेच झाल्याचे सुद्धा महिलेने कोर्टासमोर सांगितले. कोर्टाने महिलेची बाजू घेऊन या सहकाऱ्याला आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी १० हजार युआन म्हणजेच तब्बल १ लाख १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese women sues male colleague for hugging her too hard that broke her 3 ribs svs
First published on: 17-08-2022 at 13:31 IST