scorecardresearch

चिप्सच्या पाकीटापासून बनवले ‘जगात भारी’ Sunglasses, पुण्यातल्या तरुण उद्योजकांनी रचला इतिहास

प्लास्टिक रिसायकल करत तयार केलेल्या या सनग्लासेसना बाजारामध्ये चांगली मागणी आहे.

plastic sunglasses
(सौजन्या- Anish malpani Twitter)

Sunglasses made from chips packets: फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून हवामानामध्ये उष्णतेचे प्रमाण काहीसे वाढले आहे. यावरुन लवकरच उन्हाळा सुरु होणारा आहे हे लक्षात येते. उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होत असतो. त्यावर उपाय म्हणून लोक चष्मा, सनग्लासेसचा वापर करतात. कूल, ट्रेंडी सनग्लासेस घालून कमाल लुक करता येतो. सध्याच्या तरुणांचा कल अंतरंगी पद्धतीचे सनग्लासेस घालण्याकडे वळला आहे. सोशल ट्रेंडमध्ये फीट होणाऱ्या क्लासी सनग्लासेसमुळे उन्हापासून डोळ्यांचे रक्षण देखील होतो.

तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे, सनग्लासेस पाहिले असतील, पण प्लास्टिकपासून तयार केलेले सनग्लासेस तुम्ही वापरले आहेत का? पुणे स्थित ‘आशय’ या कंपनीने चिप्स, वेफर्सच्या पाकीटांमध्ये असणाऱ्या मेल्टी लेअर प्लास्टिक (एमएलमी) पासून सनग्लासेस तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्लास्टिक रिसायकल करुन सनग्लासेस तयार करणारी आशय पहिली कंपनी असल्याचा त्यांनी दावा केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर हे प्रकरण गाजत आहे. या प्रभावी सनग्लासेसना मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये आधी जेवणावर ताव मारला, बिल भरायची वेळ आली अन्… त्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

आशय कंपनीच्या अनिश मालपाणी यांनी कंपनीच्या या हटके उत्पादनाविषयीच्या अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आशयद्वारे तयार केलेल्या सनग्लसेसची थोडक्यात माहिती दिली. या व्हिडीओला त्यांनी “माझा सहभाग असलेला सर्वात कठीण प्रक्रिया. चिप्सच्या पाकीटमध्ये असलेल्या प्लास्टिक रिसायकल करुन तयार केलेले जगातील पहिले सनग्लासेस आम्ही जगापुढे सादर करत आहोत”, असे कॅप्शन दिले आहे. चिप्स, वेफर्सची पाकीटे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले मेल्टी लेअर प्लास्टिक रिसायकल करुन फार कठीण असते हे विधान देखील त्यांनी केले आहे.

आणखी वाचा – भूकंपामुळे उद्धवस्त झालेल्या तुर्कस्तानात बचाव पथकाला सापडला पैशांचा खजिना; घटनेचा Video Viral

घनकचरा व्यवस्थापन ही समस्या दिवसेंदिवस मोठी होत आहे. शहरांमध्ये, गावांमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण आहे. या प्लास्टिकच्या कचऱ्याचे विघटन होणे अशक्य मानले जाते. प्लास्टिकच्या एका छोट्या तुकड्याचे विघटन होण्याकरीता लाखो वर्ष जाऊ शकतात असे म्हटले जाते. असे असूनही प्रत्येक क्षेत्रांमध्ये प्लास्टिकचा वापर वाढला आहे. यावर उपाय म्हणून 3 आर (Reuse, Reduce, Recycle) यांचा वापर केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 12:11 IST