रात्री अपरात्री कारमधून आल्या चोर आंटी आणि काय चोरी केली पाहा…VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल!

चोरी करणारे लोक आणखी काय काय चोरी करतील काही सांगता येत नाही. गल्ली-बोळात चप्पलही चोरल्याच्या चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक भन्नाट चोरीची घटना दाखवणार आहोत. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

women-thief-funny-video-viral
(Photo: Instagram/ memes.bks and schoolmemories.ig)

चोरी करणारे लोक आणखी काय काय चोरी करतील काही सांगता येत नाही. गल्ली-बोळात चप्पलही चोरल्याच्या चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक भन्नाट चोरीची घटना दाखवणार आहोत, ज्यात कोणताही खजिना लुटला नाही, कोणत्याही मंदिरासमोरील चप्पल चोरी केली नाही किंवा कोणत्याही मंदिरातली दानपेटी चोरी केलेली नाही. या भन्नाट चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही चोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. ही चोर आंटीने केलेली अनोखी चोरी पाहून नेटकऱ्यांनी तर वेगवेगळे मीम्स देखील शेअर करण्यास सुरूवात केलीय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. पाही नक्की काय आहे या चोरीमध्ये…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रात्री उशिरा एक कार रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसत आहे. कारमधून, काळ्या रंगाचा पोशाख घातलेली एक महिला येते जी संध्याकाळच्या फेरफटका मारल्यासारखं भासवत फुटपाथवरून चालत आहे. तिच्यासोबत गुलाबी ड्रेस परिधान केलेली आणखी एक महिला येते आणि तिच्या टार्गेटवर डोळा ठेवून अलर्ट होत ती पुढे पुढे येते. काळ्या रंगाच्या कपड्यांमधली महिला नंतर फुटपाथच्या मधोमध ठेवलेल्या रोपट्यांमधून एक रोप उचलते आणि नंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या तिच्या कारमध्ये घेऊन जाते. त्यानंतर कारमधून या चोर आंटी निघून जातात. ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : विमानतळावरच महिलांची ‘दारू पार्टी’, इतर प्रवाशांना सुद्धा वाटली दारू

पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : मोठ्या स्टाईलमध्ये बाईक स्टार्ट करू लागली… मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही ! पाहा VIRAL VIDEO

‘memes.bks and schoolmemories.ig’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. अवघ्या दोन दिवसात या व्हिडीओला तब्बल ६६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल मीडिया यूजर्स देखील चोरीच्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी तर या भन्नाट चोरीच्या व्हिडीओवर विनोदी मीम्स देखील शेअर केले आहेत. एका युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, “या दोघी चोर आंटी कारमध्ये बसण्यासाठी पात्र नाहीत.” काही नेटकऱ्यांनी तर दोन महिलांना ‘बेड लॉग’ म्हटले आहे. आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलं की, “सरकारी रोप देखील इथे सुरक्षित नाही”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chorni ka video women thief funny video viral video chor aunties car thief video viral on social media prp

ताज्या बातम्या