Chris Hemsworth Hammer Tweet Viral : वेटलिफ्टर मीराबाई चानू सध्या खूप चर्चेत आहे. २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून तिने जगभर भारताचं नाव रोशन केलं आहे. याबद्दल सर्वसामान्यांपासून ते अनेक मोठे स्टार्स तिचे अभिनंदन करत आहेत. यात हॉलिवूड फिल्म ‘थॉर’ मधील अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ हा सुद्धा मीराबाई चानूचा मोठा फॅन बनला आहे. नुकतंच त्याने ट्विटरवर एक ट्विट करत वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचं अभिनंदन करत तिच्या कामगिरीचं कौतुक केलंय. त्याचं हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्यानंतर हा अभिनेता चांगलाच चर्चेत आलाय. त्याचं कारणही तसंच आहे. हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ याच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला टॅग करत ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ असं सांगितलं. मग यावर अभिनेता ख्रिस हेम्सवर्थने जे उत्तर दिलंय ते वाचून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ त्याने साकारलेल्या ‘थॉर’ पात्रासाठी प्रसिद्ध आहे. ख्रिस हेम्सवर्थच्या ‘थॉर’च्या कॅरेक्टरसाठी भारतातही मजबूत फॅन फॉलोइंग आहे. खरं तर, कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील साईखोम मीराबाई चानूच्या विजयावर एका सोशल मीडिया युजरने ख्रिस हेम्सवर्थला ट्विटरवर टॅग केलं आणि लिहिलं, ‘थॉरला त्याचा हातोडा मीराबाई चानूला देण्याची वेळ आली आहे.’

आणखी वाचा : मोठ्या भावाची ही ‘कॅच’ छोट्याला जीवनदान देणारी ठरली! हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हे ट्विट:

आणखी वाचा : खासदाराचा न्यूड VIDEO VIRAL, नेता म्हणाले, “हा मॉर्फ केलेला व्हिडीओ, लॅबमध्ये तपासा”

या ट्विटवर कमेंट करताना ख्रिसने जे लिहिलं आहे मन जिंकणारं आहे. यावर उत्तर देत ख्रिस हेम्सवर्थने लिहिलं की, ‘हा तिचा अधिकार आहे. अभिनंदन, सायखोम, तू महान आहेस.”

पाहा ख्रिस हेम्सवर्थचे हे ट्विट :

आणखी वाचा : कॅफेमध्ये कपलंच नव्हे तर सापही रोमान्स करतात! विश्वास बसत नसेल तर हा VIRAL VIDEO एकदा पाहा!

ख्रिस हेम्सवर्थचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मीराबाईने एक ट्विट केलं, ज्यामध्ये ती आपल्या हातात थॉरचा हातोडा घेऊन दिसत आहे. ख्रिसचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे हे ट्विट इंटरनेटवर प्रचंड व्हायरल करत आहेत. ख्रिसच्या या उत्तराने त्याने त्याच्या भारतीय फॅन्सची मने जिंकली आहेत.

आणखी वाचा : चिप्सच्या पाकिटांपासून पिशव्या आणि बरंच काही! पुणेकर महिलांच्या या सुंदर उपक्रमाचा VIDEO VIRAL

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये साईखोम मीराबाई चानूने भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे बिंदियारानी देवीने रौप्यपदक पटकावले. गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या ४९ किलो गटात यावेळी विक्रमी २०१ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chris hemsworth reacts to mirabai chanus win thor hammer tweet goes viral prp
First published on: 07-08-2022 at 11:27 IST