नेटकरी व्हिडीओमधील शिक्षिकेचं कौतुक करत आहेत. (Photo : Instagram)
सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण त्यातील ठराविक व्हिडीओ असे असतात जे अनेकांना मनापासून आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी व्हिडीओमधील शिक्षिकेचं मनापासून कौतक करताना दिसत आहेत. खरं तर बॉलिवूडच्या गाण्यांची आवड आणि त्या गाण्यांवर डान्स करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता येत नाही. अनेक पार्ट्या, लग्नसमारंभ आणि शालेय कार्यक्रमांमध्ये लोक हिंदी गाण्यांवर जोरदार डान्स करताना दिसतात. बॉलीवूडचं गाणं कानावर पडताच लोकांचे पाय आपसूकच थिरकायला सुरुवात करतात.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
अशा परिस्थितीत एखाद्या शिक्षकाला नाचायला सांगितले तर ते तरी कसा नकार देतील? सध्या अशाच एका महिला शिक्षिकेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती बॉलिवूड चित्रपट “हम” या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. महिला शिक्षिकेचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘हम…’ या चित्रपटातील ‘चुम्मा चुम्मा दे दे’ या प्रसिद्ध गाण्यावर स्टेजवर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. ही शिक्षिका आपल्या डान्सने सगळ्यांची मन जिंकताना दिसत आहे. अनेकांना या शिक्षिकेचा डान्स आवडला असून लोक तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
pritykeshar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील शिक्षिकाच्या डान्सच्या स्टेप्स पाहून समोर उपस्थित सर्व विद्यार्थी खूप खुश झाले आहेत, कारण ते जोरात टाळ्या वाजवत शिक्षिकेच्या डान्सला दाद देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ एका शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील असल्याचे दिसून येतं आहे. साहजिकच आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना पाहून कोणत्याही शिक्षकाला आनंद होतो. तो आनंद व्यक्त करण्यासाठी डान्स हा करणं एक उत्तम मार्ग आहे. तोच आनंद या महिला शिक्षेकेने डान्सद्वारे व्यक्त केला, ज्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.