Viral Video Man travelled from Australia For CJP Protest : कोण बरोबर, कोण चूक, कोण मोठे, कोण लहान यापेक्षा आज सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुलांचे भविष्य. या भविष्याचे रक्षण करण्यासाठी स्वतः देशभरातील विद्यार्थी भरपावसात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सरकारविरोधात सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) च्या आंदोलनामुळे या असंतोषाचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने यामध्ये सहभागी होताना दिसत आहे आणि सरकारविरोधात तीव्र संताप व्हिडीओ, पोस्ट आणि कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत.
कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी, पालक, समर्थक सहभागी झाले आहेत. पण, सध्या अशा एका आंदोलकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाहून दिल्लीला खास विमान प्रवास करून पोहोचला आहे आणि त्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च केले आहेत. या गोष्टीचा पुरावा दाखवण्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियन ओळखपत्रही दाखवले. त्यानंतर या आंदोलनात सहभागी होण्यासाठी एवढा खर्च का केला याबद्दल स्पष्टीकरणसुद्धा दिले आहे.
आंदोलन हाताळण्याच्या भूमिकेवर टीका (Viral Video )
त्याने नीट (NEET) किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा दिलेली नाही. मात्र, त्याने बी.टेक.ची पदवी प्राप्त केली आहे. त्याच्या मते, हा मुद्दा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाही; तर आंदोलन हाताळण्याच्या सरकारच्या भूमिकेवर त्याने टीका केली असून, सुरू असलेल्या उपोषणाकडे आणि आंदोलकांशी संवाद साधण्यात होत असलेल्या दुर्लक्षाकडेही त्याने लक्ष वेधले आहे. इतक्या दिवसांपासून उपोषणाला बसूनही कोणीही संवाद साधण्यास तयार नाही याबद्दल त्याने खंत व्यक्त केली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sarthakstoriess या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “इतिहास घडतोय… आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात”, “एकीकडे मंत्र्यांची मुलं देश सोडत जात आहेत… तर दुसरीकडे दादा परदेशातून परत येऊन सिस्टीम बदलण्याची तयारी करतो आहे”, “दादा मनापासून सलाम”, “मनापासून सलाम त्या व्यक्तीला, जो जंतर-मंतरवर उभा राहून अनेक भारतीयांच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहे. तुमचे धैर्य आणि पाठिंबा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे” आदी अनेकविध कमेंट्स व्हिडीओखाली दिसून आल्या आहेत.
