viral video fact check girl showing Palestine flag in CJP protest : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळले. हा व्हिडीओ नवी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) अलीकडील आंदोलनाचा असल्याचा दावा केला जात होता. या व्हिडीओमध्ये दिल्लीचा एक पोलिस आंदोलनकर्त्या तरुणीच्या हातातून पॅलेस्टाईनचा ध्वज काढून घेताताना दिसत आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ २०२३ मधील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनातील आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @therevanthtweet ने हा व्हायरल व्हिडीओ त्याच्या प्रोफाईलवर अलीकडील म्हणून शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ अलीकडील म्हणून शेअर करत आहेत.

https://www.instagram.com/reels/DbAfqP0OHu7

तपास

आम्ही व्हायरल व्हिडीओमधून मिळवलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपासाला सुरुवात केली. गूगल सर्चवरील एका सूचनेनुसार हा व्हिडीओ २०२३ मधील असल्याचे सांगण्यात आले.

व्हिडीओच्या वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या वॉटरमार्कवर लिहिले होते की, Journo Mirror.

त्यानंतर आम्ही “Journo Mirror Palestine” असा एक कीवर्ड गूगलवर सर्च केला.

या माध्यमातून आम्हाला “Journo Mirror” चे यूट्यूब चॅनेल सापडले आणि “Palestine” हा कीवर्ड वापरून शोध घेतल्यावर आम्हाला दोन वर्षांहून अधिक काळापूर्वी अपलोड केलेला एक व्हिडीओ मिळाला.

साधारण १३ मिनिटांच्या आसपास तुम्हाला व्हायरल व्हिडीओतील क्षण पाहता येतील.

हा व्हिडीओ २८ ऑक्टोबर २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता.

आम्हाला नॅशनल हेराल्डच्या (National Herald) वेबसाईटवर या आंदोलनाबद्दलच्या एक बातमीचा अहवालदेखील सापडला.

https://www.nationalheraldindia.com/national/over-50-detained-during-pro-palestine-protest-at-jantar-mantar

या अहवालात म्हटले आहे की, ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर संघर्षामध्ये अडकलेल्या दोन्ही देशांदरम्यान तात्काळ युद्धबंदीची मागणी करत, आंदोलकांनी “फ्री पॅलेस्टाईन” (Free Palestine) च्या घोषणा दिल्या. तेव्हापासून इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो लोक मारले गेले आहेत.

निष्कर्ष

नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असणाऱ्या सीजेपी (CJP) च्या आंदोलनातील अलीकडील व्हिडीओ म्हणून २०२३ मधील जुना आणि असंबंधित व्हिडीओ शेअर केला जात आहे. हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.