CJP Protest Fact Check Viral Video : नीट पेपर फुटीनंतर सरकारविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचं (सीजेपी) आंदोलन सुरू आहे. सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या बरोबर विद्यार्थ्यांपासून वृद्ध मंडळींपर्यंत अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिल्लीतील जंतर मंतरसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये या आंदोलनाचे पडताना दिसून आले आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

यापैकी लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जाणारे दोन व्हिडीओ आढळले. एका व्हिडीओमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय कारमधून प्रवास करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स दिसत असून, दोघेही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचल्याचा दावा केला जात आहे.

पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, दोन्ही व्हिडीओ जुने आहेत आणि त्यांचा सीजेपी (CJP) आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. हे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

काय होत आहे व्हायरल?

१. इन्स्टाग्राम युजर @thehindustan_file ने तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा हा व्हायरल व्हिडीओ एका दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह इन्स्टाग्रामवर शेअर केला.

इतर युजर्सनीही हाच व्हायरल व्हिडीओ याच दाव्यासह शेअर केला…

http://instagram.com/p/Da9VY18BUIq/

२. @The Deshbhakt या यूट्यूब चॅनेलने सुनीता विल्यम्स यांचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला १५ लाख (1.5 million) व्ह्युज मिळाले आहेत.

इतर युजर्सही तत्सम दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास

१. आम्ही तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी जंतरमंतरवर उपस्थित राहून सीजेपी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा दावा करणाऱ्या व्हिडीओची पडताळणी केली. आम्ही या व्हायरल व्हिडीओमधून की-फ्रेम्स (keyframes) काढल्या आणि त्या की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च (reverse image search) केले.

आम्हाला अगदी असाच व्हिडीओ ‘हर्षिता कार्तिक’ (Harshitha Karthik) नावाच्या इन्स्टाग्राम युजरने ४ मे रोजी पोस्ट केलेला आढळला.

४ मे २०२६ रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे अधिकृत निकाल व मतमोजणी जाहीर झाली. अभिनेत्यातून राजकारणी झालेले सी. जोसेफ विजय यांचा ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

आम्हाला असेच आणखी काही व्हिडीओ आढळले, ज्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री चेन्नईतील लोयोला कॉलेजमध्ये (Loyola College) त्यांचे विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी जात होते.

https://www.instagram.com/reels/DX69GsEKN1S

२. त्यानंतर आम्ही अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या व्हिडीओची पडताळणी केली.

आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपासाला सुरुवात केली.

आम्हाला पाच महिन्यांपूर्वी ‘Nomad Ambience’ या यूट्यूब चॅनेलने पोस्ट केलेला व्हिडीओ आढळला.

आम्हाला असाच व्हिडीओ २२ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेलादेखील आढळला.

यामध्ये वापरण्यात आलेल्या हॅशटॅगपैकी एक “klf” असा होता.

२२ जानेवारी रोजी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी ‘केरळ लिटरेचर फेस्टिव्हल’चे (Kerala Literature Festival) उद्घाटन केले.

https://www.thehindu.com/books/astronaut-sunita-williams-kozhikode-kerala-literature-festival-2026/article70536814.ece

आम्ही हे देखील पाहिले की, व्हायरल व्हिडीओमध्ये जे पोलिस अंतराळवीरांना सुरक्षा देत होते, त्यांच्या खांद्यावरील पॅचेसवर ‘केरळ पोलिसांचा’ (Kerala Police) लोगो होता.

निष्कर्ष

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरला भेट दिली नाही. दोन्ही व्हायरल व्हिडीओ जुने असून ते दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केले जात आहेत…