scorecardresearch

New Zealand PM : ‘ती’ देश सांभाळणार आणि ‘तो’ मूल

पंतप्रधान पदावर असताना आई झालेल्या त्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. ३७ वर्षीय जसिंडा आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

Jacinda-Ardern 830
मुलीची काळजी त्यांचे जोडीदार क्लार्क गेफोर्ड घेणार आहेत.

एका स्त्रीचं आयुष्य फक्त चूल आणि मुल यापुरताच मर्यादीत असतं अशी मानसिकता आजही लोकांमध्ये असली तरी काही जण मात्र हे बुसरटलेले विचार बदलत आहे. वास्तविक मुलांना सांभाळणं, त्याचं संगोपन करणं हे फक्त आईचं कर्तव्य नाही तर त्यात वडिलांचाही तितकाच सहभाग असला पाहिजे हे क्लार्क गेफोर्ड यांनी दाखवून दिलं. क्लार्क हे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांचे जोडीदार आहेत. जसिंडा आर्डेन यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. गेल्या महिन्यात त्यांनी मुलीला जन्म दिला याची आनंदवार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शेअर केली होती.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न देणार राजीनामा; म्हणाल्या, “आता ती वेळ…”

जसिंडा सहा आठवड्याच्या रजेवर आहे. ही रजा संपल्यानंतर त्या पुन्हा रुजू होणार आहेत. मात्र त्यानंतरच्या काळात त्यांच्या मुलीची काळजी त्यांचे जोडीदार क्लार्क गेफोर्ड घेणार आहे. क्लार्क निवेदक आहेत. आपलं काम पूर्ण झाल्यानंतर ते नोकरी सोडणार आहे. जसिंडा कामावर रूजू झाल्या की क्लार्क पूर्णवेळ मुलीच्या संगोपनासाठी देणार आहेत. जसिंडा आणि क्लार्क हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.

“भारताला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसारख्या नेत्याची गरज,” काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान!

३७ वर्षीय जसिंडा आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. २००८ साली जसिंडा या न्यूझीलंडच्या संसदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अनेक वादग्रस्त समस्यांवर जसिंडा यांनी काम केलं आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पंतप्रधान पदाची सुत्रं स्विकारली. विशेष म्हणजे त्यांना २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तरुण आणि महिला मतदारांनी त्यांना प्रचंड पाठिंबा दिला. पंतप्रधान पदावर असताना आई झालेल्या त्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. याआधी बेनझीर भुत्तो या पाकिस्तानच्या पंतप्रधान असताना त्यांनी मुलीला जन्म दिला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-07-2018 at 13:07 IST