Tiger vs Bear Fight Viral Video: वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात तो समोरच्या प्राण्याचा फडशा पाडतो. त्यामुळे वाघाची एण्ट्री होताच मोठमोठे शिकारीसुद्धा जंगलात दडून बसतात. वाघाच्या जबड्यात एखादा प्राणी अडकला की, मग खुद्द यमराजदेखील त्याला वाचवू शकत नाही, असं म्हटलं जातं. परंतु, याच वाघाशी एका अस्वलानं पंगा घेतला आणि संपूर्ण खेळाचा नूरच बदलून दिला. या अनोख्या खेळात नेमकं काय घडलं आणि कोण पडलं कुणावर भारी? ते जाणून घ्या… 

जंगलाचं एक स्वतंत्र आणि भयानक नियमांनी चालणारं जग असतं. इथे कोण कधी कुणाची शिकार होईल, सांगणं कठीण असतं. इथे नियम एकच, ‘ज्याचं बळ, त्याचं राज्य’ म्हणूनच वाघाला जंगलाचा राजा मानलं जातं. पण, या ‘राजा’लाही अधूनमधून एखादा सवाशेर भेटतो आणि मग त्यालाही शेपूट खाली करून पळावं लागतं. असंच काहीसं एका धक्कादायक दृश्य या व्हिडीओत पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या या लढाईमध्ये अस्वलानं थेट जंगलाच्या राजालाच धूळ चारली आहे.

या थरारक व्हिडीओत वाघ आणि अस्वल यांच्यात प्रचंड चुरशीची झुंज सुरू आहे. सुरुवातीला वाघ आपल्या नेहमीच्या चपळाईनं अस्वलावर हल्ला करतो आणि त्याला दूर फेकून देतो. अनेक प्रेक्षकांचंही हेच मत होतं की, आता अस्वलाचं काही खरं नाही; पण हे जंगल आहे. येथे प्रत्येक क्षण अनपेक्षित असतो.

अस्वल एक क्षण थांबतो… आणि मग आक्रमणाची दिशा बदलते. अस्वल जोरात पलटवार करतो. वाघाच्या गळ्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि मग उभा राहून वाघाच्या डोक्यावर पंजाचे जोरदार वार करू लागतो. वाघदेखील आपली ताकद लावतो; पण आता अस्वल आक्रमकतेच्या शिखरावर पोहोचलेला असतो.

शेवटी या लढाईचा शेवट असा होतो, जिथे जंगलचा राजा म्हणवणारा वाघ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मागे हटतो आणि पळ काढतो. इतकी प्रचंड ताकद आणि दहशत असलेल्या प्राण्यालाही अस्वलासमोर नमतं घ्यावं लागतं, हे पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कोट्यवधी वेळा पाहिला जात आहे. लोक, “खरा राजा कोण? वाघ की अस्वल?”, “हीच खरी जंगलातील रिअॅलिटी आहे, इथे कोणी कायम राजा नसतो.” आदी कमेंट करीत आहेत.