लहान मुलं किती गोड आणि निरागस असतात. लहान मुलांनी केलेली प्रत्येक गोष्ट किती गोंडस वाटते. अशाच एका गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो नेटकऱ्यांना वेड लावत आहे.

नुकताच स्वांतत्र्य दिन उत्साहात पार पाडला. या दिवशी अनेक शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त अनेक उत्साही आणि गोंडस मुले आपल्या गोंडस आवाजात जोरदार भाषण करतात, राष्ट्रगीत गातात. अनेकदा मुलांना भाषण आठवत नाही किंवा विसरतात तर कधी नुसते तोंड हलवतात. असेच काहीसे अरुणाचल येथील चिमुकलीबरोबर घडले. याच चिमुकलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी ही चिमुकली डोळे बंद करून जण-गण-मन हे राष्ट्रगीत गाताना दिसत आहे.

राष्ट्रगीत गाणारी चिमुकली

व्हायरल व्हिडिओमध्ये, ती मुलगी राष्ट्रगीताच्या काही ओळी अचूकपणे गाऊ शकली नाही, परंतु तिच्या खऱ्या भावना आणि प्रामाणिकपणाने सर्वांची मने जिंकली आहेत. प्रामाणिकपणे आणि अभिमानाने राष्ट्रगीत गायल्याबद्दल सोशल मीडियावर तिला ‘खूपच गोंडस’ म्हटले जात आहे.

राष्ट्रगीत गाताना तिचे गोंडस हावभाव खूपच गोड दिसतात. असे वाटते की, ती छोटी बाहुली राष्ट्रगीताशी जुळवून घेण्यासाठी धडपडत आहे. हा व्हिडिओ दाखवतो की, भारताच्या ईशान्य भागातील मुले देखील देशाचे राष्ट्रगीत अभिमानाने गात आहेत.

व्हायरल व्हिडिओ पहा

अरुणाचल प्रदेशातील या चिमुकलीचा राष्ट्रगीत गातानाचा हा गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वापरकर्त्याने शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘अरुणाचलमधील एक छोटा आवाज आणि राष्ट्रगीताचा जोरदार प्रतिध्वनी जगाला सांगत आहे की, मला भारत माहित आहे आणि भारत माझ्यात आहे. जय हिंद.’

‘इंटरनेटवरील सर्वात आवडती गोष्ट’

हा व्हिडिओ व्हायरल होताच, अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘इंटरनेटवरील सर्वात सुंदर गोष्ट.’ दुसऱ्याने म्हटले, ‘या मुलीच्या राष्ट्रगीताने देशभक्ती आणि प्रेमाची भावना व्यक्त केली. खूप छान.’

आणखी एकाने लिहिले की, “ती लहान मुलगी किती मनापासून गात होती—डोळे मिटून, मान उंच धरून तर दुसऱ्याने लिहिले की, देशभक्ती शिकवावी लागत नाही ती रक्तात असते.”