फेकन्युज : सौरऊर्जेला जर्मनीतील छायाचित्राचा ‘प्रकाश’

ज्या पाश्र्वभूमीवर सिद्धरामय्या यांचे करारी बाण्याचे छायाचित्र झळकले, ते निश्चितच लक्ष वेधून घेणारे होते.

कर्नाटकातील तुमाकुरु जिल्ह्य़ातील पवगड तालुक्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पवगड सौरऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच झाले. राज्यातील काँग्रेस सरकारच्या वतीने उचलण्यात आलेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी अनेकांकडून वाहवाही मिळविली. अर्थात दोन हजार मेगावॅट इतकी वीजक्षमता निर्मिती असलेल्या या प्रकल्पाचे महत्त्व काय आहे, तो किती फलदायी ठरणार आहे, याची जाहिरात करणारे फलक प्रमुख शहरांमध्ये झळकले खरे. यात मुख्यमंत्र्यांचीही छबी झळकली.

ज्या पाश्र्वभूमीवर सिद्धरामय्या यांचे करारी बाण्याचे छायाचित्र झळकले, ते निश्चितच लक्ष वेधून घेणारे होते. पण छायाचित्रातील सौरऊर्जा प्रकल्प हा खराखुरा नव्हता. जर्मनीतील बवेरिया येथील ‘सोलर पार्क’चे ते छायाचित्र होते. ते कर्नाटकातील नव्हते! आता ‘नव्हते’ अशासाठी की पार्कसंबंधी ट्विटरवरून केलेली घोषणा नंतर कर्नाटक सरकारच्या वतीने मागे घेण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cm siddaramaiah fake banner on pavagada solar power project

ताज्या बातम्या