scorecardresearch

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावरुन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांच्या क्रिएटीव्हीटीला उधाण

काही मीम्समधून उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय तर काही मीम्समधून शिवसेनेला टोमणे देण्यात आले आहेत. हे सर्व मीम्स लोकांचं मनोरंजन करणारे आहेत, हे नक्की. या मीम्सवर एक नजर टाकुया.

CM-Uddhav-Thackeray-Resign-Memes

CM Uddhav Thackeray Resign Memes : महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहीत ३९ शिवसेना आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे बुधवारी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. याचबरोबर पावणे तीन वर्षांपासून सत्तेत असणारं आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडू लागला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारीत मीम्सचा धुमाकूळ पहायला मिळतोय. काही मीम्समधून उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय तर काही मीम्समधून शिवसेनेला टोमणे देण्यात आले आहेत. हे सर्व मीम्स लोकांचं मनोरंजन करणारे आहेत, हे नक्की. या मीम्सवर एक नजर टाकुया.

आणखी वाचा : VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!

काही यूजर्स आहेत ज्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे भविष्य देखील दाखवले आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरे जीवतोड मेहनत घेत होते, मात्र त्यांना या प्रयत्नात यश आले नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray resign memes eknath shinde devendra fadnavis maharashtra government political crisis shivsena bjp mahavikas aghadi hilarious memes viral on social media prp