सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा अंगावर शहारा येतो. त्यासोबत निसर्गाचं चक्र माणसामुळे कसं विस्कळीत होते, याची प्रचिती येते. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे, इथे रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. वन्यप्राणी आणि त्यांची जीवनशैली पाहण्याची उत्सुकता कायमच नेटकऱ्यांना असते. त्यात थरारक व्हिडीओंना नेटकऱ्यांनी पसंती असते. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. एक साप मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकलेला दिसत आहे. जाळ्यात अडकलेला साप हा किंग कोब्रा आहे. त्याच्या एका दंशाने माणसाचा मृत्यू होतो. व्हायरल व्हिडीओमध्ये कोब्राला वाचवताना पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला तर नवल वाटायला नको.

सापांची भीती इतकी असते की कुणीही त्यांच्या जवळ जाण्यास धजावत नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी साप दिसला की पळून जाणं पसंत करतात. मात्र गेल्या वर्षात मानवी वस्तीजवळ साप येताना दिसत आहेत. त्यामुळे सर्पमित्र सापाला पकडून जवळच्या जंगलात किंवा योग्य ठिकाणी सोडतात. असात एक व्हिडीओ समोर आला आहे, यात एक किंग कोब्रा माशांच्या जाळ्यात अडकलेला दिसत आहे. याबाबतची माहिती मिळताच त्याला वाचवण्यासाठी सर्पमित्रांची टीम आलेली दिसते. एक व्यक्ती पहिल्यांदा किंग कोब्राला पकडून मोकळ्या जागेत आणताना दिसत आहे, त्यानंतर त्याला बाटलीतून पाणी पाजताना दिसत आहे. यामुळे अनेक दिवसांपासून तहानलेल्या किंग कोब्राची तहान शमते आणि तो शांत होतो.

यानंतर, किंग कोब्राचे तोंड पकडून कात्रीच्या साहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक सापाला इजा न करता त्याच्या शरीराभोवती गुंडाळलेले जाळे कापतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला आहे.