Mumbai local video: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मात्र आता लाइफलाइनचा हा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे. सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोकलच्या मागे जीव मुठीत धरून धावतो आणि लोकलमध्ये चढतो. फक्त पुरुषच नाही तर महिलांचाही रोजचा प्रवास हा असाच असतो. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात तसंच मुंबई लोकलचाही तोच संघर्ष महिलांच्याही वाट्याला येतो.

मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते. कधी सीटवरुन होणारी तुंबळ हाणामारी, तर कधी प्रवाशांचे भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या मुबंईल लोकच्या डब्यातील एक अतिशय मजेशीर आणि तेवढाच गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुसळधार पाऊस आणि प्रचंड गर्दीत एका किळसवाण्या पाहुण्याने एन्ट्री केली अन् महिलांची चांगलीच धांदल उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलांच्या डब्यात एका झुरळाचा शिरकाव झाला आहे. ते पाहताच महिलांनी एकच गोंधळ घातला. खरं तर एक फटका मारला तरी ते झुरळ मरू शकतं. पण बहुधा कोणीही ते धाडस करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे झुरळ आपल्या अंगावर येऊ नये म्हणून काही महिला थेट सीटवर उभ्या राहिल्या आहेत, तर काही जणी मोठ्याने आरडाओरडा करत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ singeryogesh.official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.एका नेटकऱ्याने लोकलमध्ये काय घडेल सांगता येत नाही असे म्हटले आहे, दुसऱ्या एका नेटकऱ्याने अरे एका फटक्यात झुरळ मेले असते, पण यांच्या दमच नाही असे म्हटले आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने लाडक्या बहिणी झुरळाला घाबरल्या अशी कमेंट केली आहे.