College Girl Viral Dance on Gulabi Sadi: महाविद्यालयीन जीवन म्हणजे उत्साह, मैत्री, धमाल आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणींचा खजिना. विशेषतः महाविद्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहताना दिसतो. अशाच एका महाविद्यालयामधील सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीनं लोकप्रिय मराठी गाणं ‘गुलाबी साडी’वर केलेला जबरदस्त डान्स पाहून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले.
व्हिडीओची सुरुवात होताच ‘गुलाबी साडी’ गाण्याचे सूर कानावर पडतात आणि स्टेजवर आलेली तरुणी आत्मविश्वासानं डान्सला सुरुवात करते. पहिल्या काही क्षणांतच तिच्या अचूक डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील सुंदर हावभाव आणि गाण्याशी जुळणारा तिचा पदन्यास यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष पूर्णपणे तिच्याकडे खिळून राहिल्याचे दिसते.
डान्समध्ये ऊर्जा आणि नजाकतपूर्ण हावभावांचा अप्रतिम मिलाफ
संपूर्ण डान्सदरम्यान तरुणीची ऊर्जा क्षणभरही कमी झाल्याचे दिसत नाही. नृत्यातील प्रत्येक ठेका तिनं सहजतेनं सादर केला आणि त्यामुळे तिचं नृत्य प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरलं असणार यात शंका नाही. ती गाण्याच्या प्रत्येक ओळीच्या अर्थ आणि तालानुसार आपल्या हावभावातून नृत्य दिलखेचक करताना दिसते. मंचावरील नृत्यातील तिचा सहज वावर आणि त्यातून झळकणारा आत्मविश्वास यांमुळे तिच्या सादरीकरणाला वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे दिसते.
विशेष म्हणजे गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर तिच्या नृत्यामधील लय, वेग आणि उत्साह कायम राहतो. त्यामुळे प्रेक्षकही नकळत तिच्या नृत्यामध्ये रंगून जातात. अनेक जण तिच्या प्रत्येक स्टेपला टाळ्यांच्या गजरात दाद देताना दिसतात.
टाळ्या, शिट्या आणि मोबाईल कॅमेऱ्यांची गर्दी
तरुणीचे नत्य सुरू असताना सभागृहातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. काही विद्यार्थी टाळ्या वाजवत तिचे कौतुक करतात; तर काही जण मोबाईलमध्ये तिच्या नृत्याद्वारे तिला टिपण्यात मग्न होतात. अनेक विद्यार्थी गाण्याच्या तालावर थिरकताना दिसतात. प्रत्येक आकर्षक स्टेपनंतर प्रेक्षकांचा जल्लोष आणखी वाढत जातो.
कार्यक्रमात उपस्थितांनी तिच्या नृत्याला भरभरून प्रतिसाद दिला. टाळ्या, शिट्या आणि जल्लोषात तिच्या प्रत्येक डान्स स्टेपचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सोशल मीडियावर व्हिडीओची जोरदार चर्चा
हा डान्सचा व्हिडीओ आता विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत असून, आपल्या मित्रमंडळींसोबतही शेअर करीत आहेत. मराठी गाण्यावर केलेल्या या दमदार डान्समुळे नेटकऱ्यांनीही तरुणीच्या आत्मविश्वासाचे आणि नृत्यकौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे.
हा व्हायरल व्हिडीओ पुन्हा एकदा सिद्ध करतो की, मेहनत, आत्मविश्वास आणि उत्तम कला असेल, तर कोणतीही व्यक्ती आपल्या सादरीकरणाने काही क्षणांत हजारो लोकांची मनं जिंकू शकते. गुलाबी साडी या लोकप्रिय मराठी गाण्यावर सादर केलेल्या या आकर्षक नृत्यानं सध्या सोशल मीडियावर वेगळीच छाप पाडली आहे.
