Teacher dance viral video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात शिक्षिका विद्यार्थ्यांसमोर चक्क डान्स करताना दिसतेय. यावेळी ही शिक्षिका वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करीत आहे.

वर्गात शिक्षिकेचा तुफान डान्स

इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका कॉलेजमधील शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसतेय. इतकंच नव्हे, तर यावेळी वर्गातील एका विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीनंही तिच्यासोबत ठेका धरला. यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या हिरव्या रंगाच्या फळ्यावर विद्यार्थ्यांनी ‘हॅप्पी बर्थडे रश्मिका मॅम’, असं लिहिलं होतं. यावरून शिक्षिकेचा त्या दिवशी वाढदिवस असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
a bride fell down during varmala ceremony
VIDEO : वरमाला घालण्यासाठी नवरदेवाने उडी मारली अन् नवरी धाडकन खाली आपटली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी

हेही वाचा >> VIDEO : हेल्मेट घातले म्हणून वाचला; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

नेटकऱ्यांच्या कमेंट्स चर्चेत

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण शिक्षिकेचं कौतुक करताना; तर काही जण शिक्षिकेला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “मलाही पुन्हा कॉलेजमध्ये जायचं आहे.” तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय, “शिक्षिका असो किंवा कोणी संत असो. या जगात सर्वांना आनंदानं जगण्याचा अधिकार आहे.” तर आणखी एका युजरनं लिहिलंय, “हा सगळा सोशल मीडियावर रील पाहण्याचा वाईट परिणाम आहे.” हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @log.kya.kahenge या नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.