‘या’ स्मार्टफोन्सवर उद्यापासून Whatsapp चालणार नाही; तुमचा फोन तर यात नाही ना? जाणून घ्या…

ज्या फोनमध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असतील तिथे Whatsapp चालणार नाही.

whatsapp data

Whatsapp चे यूजर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधींच्या संख्येने आहेत. जवळपास आपल्या आयुष्याचाच भाग झालेलं हे Whatsapp उद्यापासून काही स्मार्टफोन्सवर चालणार नाही. Whatsapp उद्यापासून अपग्रेड होत असल्याने हा बदल होणार आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर Whatsapp चालणार नाही.

ज्या फोनमध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असतील तिथे Whatsapp बंद होईल. त्यामुळे Whatsapp सुरु ठेवायचं असल्यास काही जणांना नवे स्मार्टफोन्स घ्यावे लागणार आहेत. तुमचा फोन व्यवस्थित चालत असला तरी Whatsapp साठी नवा फोन घेणे भाग आहे. अजून एक पर्याय आहे तो म्हणजे स्मार्ट फोनची ऑपरेटिंग सिस्टीम बदलून घेण्याचा. अशी ऑपरेटिंग सिस्टीम फोनमध्ये टाकता येईल जिच्या आधारे Whatsapp चालेल. मात्र हा पर्याय अत्यंत किचकट आहे.

बरं हा नवा बदल फक्त अँड्रॉईड फोनमध्येच नाही तर ऍप्पलच्या फोनच्या संदर्भातही होणार आहे.

कोणत्या फोनवरती Whatsapp चालणार नाही-

  • सॅमसंग – गॅलेक्सी ट्रेंड लाइट, गॅलेक्सी ट्रेंड २, गॅलेक्सी SII, गॅलेक्सी S3 mini, गॅलेक्सी Xcover 2, गॅलेक्सी कोअर, गॅलेक्सी Ace 2
  • ZTE – ग्रँड S फ्लेक्स, V956, ग्रँड X क्वाड V987, ग्रँड मेमो
  • सोनी – एक्सपिरीया सिरो, एक्सपिरीया निओ L, एक्सपिरीया Arc S.
  • इतर – अल्काटेल, अर्कोस ५३ प्लॅटिनम, एचटीसी डिझायर ५००, कॅटरपिलर कॅट B15, विको किंक फाइव्ह, विको डार्कनाइट, लिनोव्हो A820, UMi X2, Run F1, THL W8
  • एलजी – ल्यूसिड २, ऑप्टिमस F7, ऑप्टिमस F5, ऑप्टिमस L3 II, Dual ऑप्टिमस L5, Best L5 II, ऑप्टिमस L5, Dual Best L3 II, ऑप्टिमस L7, Dual Best L7 II, ऑप्टिमस F6, Enact ऑप्टिमस F3, Best L4 II, Best L2 II, ऑप्टिमस Nitro HD, ऑप्टिमस 4X HD, ऑप्टिमस F3Q.
  • Huawei: Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, and Ascend D2.
  • Apple: iPhone 6, iPhone 6s plus, iPhone SE

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Come november 1 whatsapp will not work on these smartphones here s why vsk