Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. शनिवारीही आपला पदकधडाका कायम ठेवला आहे. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकूण ४० पदकांची कमाई केलीय. ज्यात १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताच्या खेळाडूंनी पदकांची हॅट्रिक पाहून टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफर त्याच्या एका मजेशीर ट्वीटमुळे चर्चेत आलाय. त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरू लागलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर काही वर्षांनी जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याची गोष्ट निघते आणि भारतीय मन हळवं होतं. ‘कोहिनूर हिरा भारतात आणता येणार नाही’, या विचाराने भारतीयांचं मन प्रत्येक वेळी बिथरतं. ब्रिटिश राजसत्तेची शान वाढविणारा कोहिनूर कधी काळी आपला होता, हे भारतीय जनमानसाला विसरता येत नसावं. परिणामी कोहिनूर भारतात आणण्याची हाकाटी अधेमधे होत राहते. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या कोहिनूरच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफरने या कोहिनूरच्या आठवणींना उजाळा देत एक ट्वीट शेअर केलंय.

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरीचं कौतूक करत त्याने हे ट्वीट शेअर केलंय. या ट्वीटमध्ये वसीम जाफरने लिहिलं की,”भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत इतकी चांगली कामगिरी केली आहे की या वेगाने ते कोहिनूर देखील परत आणू शकतात,”. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय तुकडी विशेषतः कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी केली. शनिवारी भारत देशाने ४ सुवर्ण जिंकले. कुस्तीपटू दीपक पुनिया, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि पॅरा टेबल टेनिसपटू भावना हसमुखभाई पटेल यांनी सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीने आनंदी झालेल्या जाफरने हे ट्वीट शेअर केलं आहे.

आणखी वाचा : ‘हेलिकॉप्टर भेळ’ कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हे ट्वीट :

आणखी वाचा : जेव्हा नेटकरी म्हणाले, ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ , मग Chris Hemsworth ने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

CWG 2022 च्या १० व्या दिवशी पदकांची संख्या अधिक असू शकते. आज महिला क्रिकेट संघ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार असून कांगारू संघाला हरवून सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा आहे. याशिवाय टेबल टेनिस आणि अॅथलेटिक्समध्येही पदकांची अपेक्षा आहे. बॉक्सिंग संघाने तब्बल चार पदकांचे लक्ष्य ठेवले आहे. तर PV सिंधूच्या नेतृत्वाखालील बॅडमिंटन संघ आज भारताला पाच पदकांची खात्री देऊ शकतो. त्यानंतर महिला हॉकी संघ कांस्यपदकासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन विरुद्ध वादग्रस्त आणि हृदयद्रावक पराभवानंतर त्यांना सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले. पण यात बदल करण्याचा आणि त्यांच्या गळ्यात पदक घेऊन मायदेशी परतण्यासाठी मजबूत पुनरागमन करण्याचा विचार करतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commonwealth games 2022 bring the kohinoor back wasim jaffers praise for indian athletes goes viral prp
First published on: 07-08-2022 at 17:39 IST