Congress Leader Promises Masjid Land And Article 370: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील प्रचार सभेत केलेल्या भाषणात मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. लाइटहाऊस जर्नालिज्मला या वादादरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात असल्याचे आढळून आले. व्हिडिओमध्ये काँग्रेस चे नेते एका बैठकीत मुस्लिमांना मशीद आणि कलम 370 पुनर्स्थापित करण्याचे आश्वासन देताना दिसत आहे. आमच्या तपासात आम्हाला आढळून आले की हा व्हिडिओ डीपफेक आहे. पण याचा पुरावा काय चला पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर @pradeepthakur_4 ने व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

‘Kamal Nath meet with Muslims’ असे शब्द वापरून आम्ही गुगल सर्च करून तपास सुरू केला. यादरम्यान आम्हाला InKhabar Officialच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ आढळला.

व्हिडिओचे शीर्षक होते, ‘Congress Leader Kamal Nath in Close Door Meeting With Muslims Against RSS’ त्याला पाच वर्षांआधी अपलोड करण्यात आले होते.

कमलनाथ यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “आरएसएसचे कार्यकर्ते काय करत आहेत? माझ्याकडे माहिती आहे. आरएसएसचे कार्यकर्ते सर्वत्र पसरले आहेत. छिंदवाड्याबद्दल बोललो तर लोक येऊन मला सांगतील, छिंदवाडा नागपूरजवळ असल्याने ते त्यांना खूप सोयीचे आहे. ते सकाळी येतात आणि रात्री नागपुरात परत निघून जाऊ शकतात. त्यांच्याकडे फक्त दोन ओळी असतात बोलायला. तुम्हाला हिंदूंना मत द्यायचं असेल तर हिंदू वाघाला मत द्या. आणि मुस्लिमांना मत द्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाला मत द्या. ही त्यांची रणनीती आहे. अत्यंत सावधगिरी बाळगा, ते तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील, परंतु निवडणुकीच्या दिवसापर्यंत तुम्हाला ते सहन करावे लागेल.”

२०१८ मध्ये जेव्हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला तेव्हाच्या आम्हाला अनेक बातम्या आढळल्या.

https://timesofindia.indiatimes.com/india/kamal-nath-video-finds-congress-in-another-rss-controversy/articleshow/66624838.cms
https://news.abplive.com/elections/madhya-pradesh-bjp-shares-kamal-naths-video-cautioning-muslims-against-rss-campaign-780342
https://timesofindia.indiatimes.com/india/kamal-nath-in-video-asks-90-muslims-to-vote-bjp-asks-for-his-arrest/articleshow/66739395.cms

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही व्हिडिओमधून काढलेला ऑडिओ itisaar.ai वर अपलोड केला, हे एक AI टूल आहे जे IIT जोधपूरच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. ऑडिओच्या विश्लेषणाद्वारे असे आढळून आले की यामध्ये डीपफेक ऑडिओ वापरलेला आहे . मूळ व्हिडिओ डीपफेक ऑडिओसह सुपरइम्पोज करण्यात आला होता.

Video: यंदा तुम्ही देऊ शकता ‘चॅलेंज व्होट’? महिलेने सांगितलेला नियम काय? निवडणूक आयोगाची भूमिका वाचा

निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये काँग्रेस नेते कमल नाथ मशिदीची जमीन आणि कलम 370 पुनर्स्थापित करण्याचे आश्वासन देताना दिसत आहेत, तो व्हिडीओ एडिटेड आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. मूळ व्हिडिओ २०१८ मधील आहे, जेव्हा त्यांनी मुस्लिम समाजातील लोकांसह बैठक घेऊन त्यांना काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले होते. मूळ व्हिडिओवर AI ऑडिओ सुपरइम्पोज करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे.

Story img Loader