काँग्रेस खासदार शशी थरूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. कधी कुणावर टीका, तर कधी फोटोमुळे चर्चेत असतात. दुसरीकडे, त्यांचं इंग्रजी सर्वानाच पचनी पडत नाही. अनेकदा त्यांनी केलेल्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरीचा वापर करावा लागतो. मात्र इंग्रजीचं इतकं ज्ञान असलेल्या शशी थरूर यांच्याकडून झालेली चूक नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सध्या अॅशेस मालिका सुरु आहे. यामध्ये पंचाचा वादग्रस्त निर्णय चर्चेचा विषय ठरला होता. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी गुरुवारी अॅशेस मालिकेसंदर्भातील एका व्हिडीओवर कमेंट केली होती. Umpire शब्द लिहिताना शशी थरूर यांच्याकडून टायपिंग मिस्टेक झाली आणि नेटकऱ्यांनी त्यांची फिरकी घेतली.

बेन स्टोक्सने टाकलेला एक चेंडू नो असतानाही पंचाला कसा दिसला नाही? यावर क्रिकेट सेव्हन यांचा एक व्हिडीओ होता. या व्हिडीओवर कमेंट करताना शशी थरुर यांच्याकडून Umpires या शब्दाच्या ऐवजी empires असा शब्द लिहीला. मग काय नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं. कमेंट्स करून त्यांना भंडावून सोडलं.

शशी थरूर यांच्याकडून टायपो मिस्टेक झाल्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

यापूर्वीही शशी थरूर यांनी ट्वीट करताना अनेक चुका केल्या आहेत. यापूर्वी एक ट्वीट करताना अहमदाबादचं स्पेलिंग चुकीचं लिहीलं होतं. अहमदाबादचं इंग्रजी स्पेलिंग Ahmadabad लिहीलं होतं. योग्य स्पेलिंग Ahmedabad आहे.