scorecardresearch

Premium

“ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर…”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कार्यकर्त्यांवर संतापले, म्हणाले… ; पाहा Video

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा हा व्हिडीओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पोस्ट करत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

congress president mallikarjun kharge got angry addressing workers in telangana video viral
"ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर…", काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांच्याच कार्यकर्त्यांवर संतापले, म्हणाले… ; पाहा Video (फोटो – @AmritYaduvanshi twitter)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यात ते आपल्याच कार्यकर्त्यांवर नाराज झाल्याचे दिसत आहेत. खर्गे यावेळी इतके भडकले की त्यांनी मंचावरूनच कार्यकर्त्यांना थेट फटकारले. भाषण सुरु असताना कार्यकर्त्यांचा मंचासमोर सुरु असलेला गोंधळ पाहून मल्लिकार्जुन खरगे संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, काँग्रेस अध्यक्ष म्हणत आहेत की, “शांत बसा, ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर बाहेर जा.” असे बोलू नका. तुला माहीत नाही का? सुरू असलेल्या या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते बोलत आहेत. आणि तुम्ही ते न ऐकता सतत बोलतच आहात. ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर जा तुमच्या जागेवर.”

Case against Congress workers for burning effigy of Prime Minister
पुणे : पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
rajyasabha (1)
सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याऐवजी राज्यसभेत जाण्याचा निर्णय का घेतला? काँग्रेससाठी हे फायद्याचे कसे ठरेल?
Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Leaders farewell to Congress
काँग्रेसला गळती आणि नेत्यांची भाजप व मित्रपक्षांकडे रीघ

ही घटना तेलंगणातील कालवकुर्तीची असल्याचे सांगितले जात आहे, एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी निवडणुकीपूर्वी म्हणाले होते, ‘मी पंतप्रधान झालो तर बाहेरून काळा पैसा आणीन आणि प्रत्येकाला १५ लाख रुपये देईन. पंतप्रधान खोटे बोलतात की खरे बोलतात? हे समजलं का?

यापुढे खर्गे म्हणाले की, ‘दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार असे आश्वासन दिले होते, पण खरचं नोकऱ्या दिल्या का? नाही दिल्या… पंतप्रधानांचे हे दुसरे खोटे आहे. पीएम मोदी शेतकऱ्यांबद्दल, खतांवर सबसिडीबद्दल बोलत राहिले. केसीआर यांनीही तेच केले. केसीआर कार्यालयात किंवा विधानसभेत बसत नाहीत. तो त्याच्या फार्म हाऊसवर बसतात आणि तिथून कारभार चालवतात. अशा सरकारला उलथून टाकावे लागेल.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकर्त्यांवर भडकल्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, हे असामान्य नाही. काँग्रेसचे अध्यक्ष असूनही खर्गे यांचा त्यांच्या सर्व जाहीर सभांमध्ये अपमान केला जातो. यावेळी जे त्यांचा अपेक्षित आदर करत नाहीत अशा कार्यकर्त्यांवर ते असहायपणे ओरडतात, खरगे दलित आहेत म्हणून काँग्रेस त्यांचा अपमान करत आहे का? असा गंभीर सवालही मालवीय यांनी उपस्थित केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress president mallikarjun kharge got angry addressing workers in telangana video viral sjr

First published on: 27-11-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×