Cop risking his life to catch the criminal | Viral Video: अनेकदा पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये होणारी फायटिंग आपण चित्रपटांतून पाहतो; पण ते अ‍ॅक्शन सीन्स फक्त चित्रपटांपुरतेच मर्यादित असतात. अंगावर अनेक गुन्हे असलेला गुन्हेगार गाडीवरून पळत सुटतो काय, एक बेधडक पोलिस ऑफिसर वाऱ्याच्या वेगानं धावत धावत त्याला पकडतो काय; अशा स्वरूपाच्या घटना आपण सिनेमांमध्ये पाहतो. पण, अशाच एका घटनेचा प्रत्यय खऱ्याखुऱ्या जीवनातही आला आहे. बंगळुरूमधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. त्यामध्ये एका धाडसी पोलिसानं आपला जीव धोक्यात घालून एका गुन्हेगाराला पकडलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

बंगळुरूमधील एका रस्त्याच्या कडेला बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या या दृश्याची सुरुवात वाहनांच्या लगबगीनं झाली. परंतु, अचानक एका स्कूटरकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. सिग्नल क्रॉस करताना चालत्या स्कूटरस्वाराला एका पोलिस शिपायानं अडवलं. परंतु, दुचाकीस्वार न थांबता, स्कूटर जोरात पळवू लागला.

Maharashtra Kolhapur Mother Saves Son's Life, Attacked With Sword shocking CCTV
VIDEO: कोल्हापुरात आई समोरच मुलावर तलवारीने सपासप वार; पोटच्या गोळ्यासाठी आई हल्लेखोरांना भिडली, शेवटी काय झालं पाहा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Tiger Man Viral Video Man acting of dying in front of his tiger animal video
VIDEO: बापरे! वाघ दिसताच व्यक्तीने केलं मृत्यूचं नाटक; वाघ जवळ आला वास घेतला अन् शेवटी काय झालं एकदा पाहाच
young woman threw the dog in the lake
‘कर्म इथेच फेडावे लागतात…’ श्वानाला तलावात फेकणाऱ्या तरुणीबरोबर घडलं असं काही VIDEO पाहून बसेल धक्का
Thief who came ask price and steal things video goes viral on social media
चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; अशी चोरी केली की VIDEO पाहून गोंधळून जाल
A Government Employeed Raped
Government Employee Raped A Goat : धक्कादायक! सरकारी कर्मचाऱ्याची वासना शमेना, आधी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार मग बकरीवर केला बलात्कार; व्हायरल VIDEO मुळे घटना उघडकीस
Bike rider fell down on the Road while doing stunt video goes viral
“जीव एवढा स्वस्त असतो का रे?” फेमस होण्यासाठी तरुणांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Kalachauki mahaganpati video
गणपती आगमन बघायला जाताय? काळाचौकीच्या महागणपती आगमनाला काय झालं पाहा; VIDEO पाहूनच धडकी भरेल

मंजेश असे या स्कूटरवरील व्यक्तीचे नाव असून, त्याच्यावर ७५ पोलिस खटले प्रलंबित आहेत. या गुन्हेगाराची वाट अडवणाऱ्या पोलिस शिपायाचं नाव दोड्डा लिंगय्या, असं आहे.

हेही वाचा… लखनऊमध्ये चाललंय काय? कारच्या सनरूफवर कपल्सचा खुलेआम रोमान्स, एकमेकांना किस केलं अन्…, VIDEO झाला VIRAL

ओळख पटताच चालत्या स्कूटरवर असलेल्या गुन्हेगाराची त्या शिपायानं कॉलर पकडली. त्यासरशी तो सावध होऊन, स्कूटर वेगानं पळवू लागला. पण, तो पोलिस शिपाईही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्यानं गुन्हेगाराची कॉलर पकडत, त्याच वेगानं त्याचा पाठलाग केला. या चकमकीत तो शिपाई रस्त्यावर पडला; परंतु त्यानं गुन्हेगाराला पकडीतून जाऊ दिलं नाही. त्या शिपायानं खाली पडल्यावरही त्याचे पाय धरून ठेवले आणि शेवटी त्या गुन्हेगाराला स्कूटर थांबवायला लावण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. तेवढ्यात तिथले दोन ट्रॅफिक पोलिस लिंगय्या यांच्या मदतीला धावून आले. मग आता तर त्या गुन्हेगाराची सुटका होणे अशक्यच होते.

परंतु, तो गुन्हेगार एवढ्यावरच थांबला नाही, त्याने त्या तिन्ही पोलिसांशी मारामारी करण्याचा प्रयत्न केला आणि एका ट्रॅफिक पोलिस महिलेला जोरात धक्का दिला. मात्र, पुढच्याच क्षणी रस्त्यावरून जाणारे लोक पोलिसांना मदत करण्यासाठी तिथे जमले आणि मंजेशला पकडण्यापूर्वीच जमावाने बेदम मारहाण केली.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘Surya Reddy’ या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा… सिलेंडरवर डान्स करताना घसरला पाय अन्…, महिलेचा VIRAL VIDEO पाहून काळजात भरेल धडकी

मीडिया रिपोर्ट्सनुसार मंजेश तुमकुरूहून बंगळुरूला पळून गेला होता. त्याला आता अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोने जप्त केले आहे.