करोनाचा प्रादूर्भाव देशभरात वाढत असल्याने सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून नागरिकांना घराच्या बाहेर निघू नये असे आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकजण घरुनच काम करत आहेत. तर घरून काम करणे शक्य नसणाऱ्यांना सक्तीची रजा मिळाली आहे. मात्र करोनाचा धोका पाहता घरात बसून राहण्याशिवाय अनेकांकडे काही पर्यायच शिल्लक नाहीय. त्यामुळेच अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर दोन दिवसातच कंटाळा आल्याच्या तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र एका व्यक्तीने याच बोरींगपणावर मात मिळवण्यासाठी चक्क करोना विषाणूच्या आकाराचे भजी बनवले आहेत.

कनिष्का विजयशेखरा या ट्विटवर अकाऊंटवरुन करोना विषाणू म्हणजेच कोवीड-१९ या विषाणूच्या आकाराचे भजी केल्याचे फोटो पोस्ट करण्यात आला. या फोटोला “मस्त तळलेले भजी” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने कुठेही करोनाचा उल्लेख कॅप्शन देताना केलेला नाही.

करोनाचा उल्लेखही या ट्विटमध्ये नसताना अनेकांनी या भजीचा आकार हा करोनाच्या विषणूसारखा असल्याचे मत नोंवदलं आहे.

हे भजी कोवीड-१९ सारखे का दिसत आहेत?

कोणाला हवेत करोना भजी?

भजीला हात लावण्याआधी हात धू

हा तर करोना पकोडा

या भजीच्या आकारावरुन चर्चा सुरु असतील तरी हे भजी तेलकट असल्याचेही भजी बनवणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. “हे भजी तेलकट असल्याने आरोग्याच्या दृष्टीने इतके चांगले नाहीयत,” असंही ट्विट या व्यक्तीनं केलं आहे. असं असलं तरी काहींनी या व्यक्तीला या भजीची रेसिपी काय आहे असा सवाल ट्विटवर विचारला आहे.