जगभरामधील १८० हून अधिक देशामध्ये फैलाव झाला आहे. अनेक देशामधील आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. असं असतानाच या कालावधीमध्ये प्रसुती झालेल्या महिला आणि त्यांच्या नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी अनेक रुग्णालयांमध्ये विशेष सोय केली जात आहे. या माता आणि बाळांना कोरनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अनेक देशांनी करोनाच्या वाढत्या रुग्णांचा आकडा लक्षात घेता गरोदर महिलांसंदर्भात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने केवळ गरोदर महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करुन घेण्याचा निर्णय अनेक देशामध्ये घेण्यात आला असून तिला भेटण्यासाठी किंवा तिच्या सोबत इतर कोणालाही गरोदर महिलांच्या वॉर्डमध्ये प्रवेश दिला जात नाही. तर काही रुग्णालयांनी या उपाययोजनेबरोबर अन्य मार्गांचाही अवलंब केला आहे. लहान बाळांना या विषाणूची लागण होऊ नये म्हणून तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. अशीच एक भन्नाट कल्पना थायलंडमधील एका रुग्णालयाने अंमलात आणली आहे.

थायलंडमधील सामूत प्राकान या प्रांतातील पाओलो रुग्णालयाने नवजात बालकांसाठी छोट्या फेस शिल्ड तयार केल्या आहेत. या रुग्णालयाने सोशल नेटवर्किंगवर नवजात बालकांच्या वॉर्डमधील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये बाळांना या छोट्या आकाराच्या शिल्ड घालण्यात आल्या असून सर्व आरोग्य कर्मचारी पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंट (पीपीई) सूटमध्ये दिसत आहेत.

“छोट्यांसाठी आणि त्यांच्या मित्रांची आम्ही अतिरिक्त काळजी घेत आहोत. नवजात बालकांसाठी आम्ही फेस शिल्ड बनवल्या आहेत. किती गोंडस दिसत आहेत ना हे! सर्व आई-बाबांचे अभिनंदन,” अशी पोस्ट रुग्णालयाच्या फेसबुक पेजवर केली आहे.

या पोस्टवर अनेकांनी रुग्णालयाने घेतलेल्या या अतिरिक्त काळजीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अनेकांनी याबद्दल रुग्णालयाचे अभिनंदन केलं आहे.