कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे त्यांच्या कामाबरोबरच लूक्ससाठी जगभरामध्ये ओळखले जातात. जगातील सर्वात तरुण नेतृत्वांपैकी एक असणारे ट्रुडो हे त्यांच्या फॅशन स्टेटमेंटमुळे कायमच चर्चेत असतात. नुकतेच ट्रुडो यांनी देशातील जनतेला करोनाच्या पार्श्वभूमीवर संबोधित केले. ट्रुडो यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे ट्रुडो यांनी करोनाबद्दल व्यक्त केलेली चिंता किंवा मांडलेले मत कारणीभूत नाहीय. ट्रुडो यांच्या एका कृतीमुळे हा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

मागील काही आठवड्यांपासून ट्रुडो हे देशातील जनतेला आणि प्रसारमाध्यमांना आपल्या ओटावा येथील शासकीय निवासाबाहेर येऊन संबोधित करताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी अशाप्रकारे देशातील नागरिकांशी संवाद साधताना सरकार लघुउद्योजकांना आर्थिक मदत करेल असे आश्वासन दिलं.

मात्र हे संभाषण सुरु करण्याआधी ट्रुडो यांनी डोळ्यासमोर आलेल्या केसांना झटका देत हाताने ते एकदम स्टाइलमध्ये मागे घेतले. आपल्यापैकी अनेकांना लॉकडाउनमुळे हेअरकट करण्याची संधी मिळाली नाही तसंच काहीसं ट्रुडोंबरोबर झाल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त ज्या पद्धतीने ट्रुडो यांनी एकदम एखाद्या चित्रपटातील हिरोप्रमाणे केस मागे घेतले त्यावर नेटकरी चांगलेच फिदा झाल्याचे चित्र दिसत आहे. ट्रुडो यांच्या या कृतीमुळेच हा व्हिडिओ एडीट करुन, त्यामागे गाणी टाकून तो व्हायरल केला जात आहे. काही भारतीयांनी तर यामागे अगदी रोमॅन्टीक गाणी टाकून व्हिडिओ व्हायरल केला आहे. आधी मूळ व्हिडिओ काय आहे ते पाहा…

नेटकऱ्यांचे याबद्दल काय म्हणणं आहे ते पाहूयात.

त्यांची हेअऱस्टाइल इतकी भारी आहे की…

बॉलिवूड ट्विस्ट

त्यांच्या राजकारणावर टीका होऊ शकते लूक्सवर नाही

हेअरस्टाइल छान आहे पण काळजी घ्या

यावर तर पुरुष पण फिदा होतील

भारतीय म्हणतायत हा तर लालाला… लाला क्षण…

मी स्लो मोशनमध्ये पाहतोय

मला कोणीतरी स्लो मोशन करुन पाठवा याचा

ट्रुडो यांचा व्हिडिओ त्यांच्या स्टाइलसाठी व्हायरल होत असता तरी त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना अमेरिका आणि कॅनडाच्या सीमा पुढील एका महिन्यासाठी बंद राहणार असल्याची महत्वाची घोषणा केली आहे. बुधवार दुपारपर्यंत (२२ एप्रिल २०२०) कॅनडामध्ये करोनाचे ३८ हजारहून अधिक रुग्ण अढळून आले आहेत. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ही एक हजार ८०० हून अधिक आहे. तसेच कॅनडात १३ हजारहून अधिक रुग्ण करोनाच्या आजारामधून पूर्णपणे बरे झाले आहेत.