भैरवी या महिलेने हे चित्र ट्विटरवर शेअर केलं आहे. वर्तमानपत्रामधील व्यंगचित्राचा फोटो काढून पोस्ट केला आहे. या फोटोला तिने ‘हे कोणी पाहिले आहे?’ अशी कॅप्शन दिली आहे.
काय आहे या व्यंगचित्रामध्ये
तमिळ वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या या व्यंगचित्रामध्ये करोना विषाणू हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना गुलाब देत आहे. ‘हॅपी फादर्स डे’ अशा शब्दांमध्ये हा विषाणू जिनपिंग यांना शुभेच्छा देत आहे. या फोटोमध्ये जिनपिंग यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव दिसत आहेत. हे व्यंगचित्र १०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे.
இது யாரு பார்த்த வேலை ? pic.twitter.com/7Go03OXUoT
— Bhairavi Nachiyar பாண்டிய நாட்டு இளவரசி (@Bhairavinachiya) June 21, 2020
चीनमध्ये असणाऱ्या हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी असलेल्या वुहान येथून करोना विषाणूचा जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये प्रादुर्भाव झाला. चीनमध्ये मे महिन्यापर्यंत एकूण चीनमध्ये करोनाने ४ हजार ६३३ जणांचा बळी गेला होता. मात्र करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेने चीनच्या बेजबाबदार वागण्यामुळे जगभरामध्ये करोनाचा फैलाव झाल्याचा आरोप अनेकदा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा चीनवर यासंदर्भात निशाणा साधला आहे. मात्रमध्ये आता नव्याने करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.