Countries without Rail Network : एकीकडे जग बुलेट ट्रेन पासून हायस्पीड ट्रेनच्या दिशेने जात आहे तर दुसरीकडे काही देश असे आहेत की जिथे रेल्वे लाईन देखील उपलब्ध नाही. या देशांमध्ये पैसे आणि संसाधने असूनही या देशांमध्ये ट्रेनची सोय केलेली नाही. या देशांमधील नागरिकांना प्रवास करण्यासाठी ट्रेनऐवजी बस किंवा अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

आज आम्ही तुम्हाला अशाच पाच देशांबाबत माहिती देणार आहोत जिथे मागणी असूनही ट्रेनची सेवा उपलब्ध नाही. चला जाणून घेऊ या.

या पाच देशांमध्ये नाही ट्रेन

भूतान
एकीकडे वंदे भारत एक्स्प्रेससारखी सेमी हायस्पीड ट्रेन भारतात धावत आहे. त्याच वेळी, त्याच्या शेजारी देश असलेल्या भूतानमध्ये एकही रेल्वे लाइन नाही, ज्यामुळे त्या देशात कोणतीही ट्रेन जात- येत नाही. मात्र, आगामी काळात भूतानला भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा विचार केला जात आहे.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

अंडोरा
दुसरे नाव अँडोरा येथून आले आहे, जो जगातील 11 वा सर्वात लहान देश आहे. येथील लोकसंख्या कमी असल्याने रेल्वेचे जाळे तयार झालेले नाही. येथील रहिवाशांना या देशाच्या अगदी जवळ असलेल्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी फ्रान्सला जावे लागते.

आता अमेरिकेत टुरिस्ट किंवा बिझनेस व्हिसावर मिळू शकते नोकरी, USCIS ने दिली परवानगी!

तिमोर
पूर्व तिमोरमध्ये रेल्वे मार्ग नाहीत आणि येथे एकही ट्रेनही धावत नाहीत. येथील लोक प्रवासासाठी बस आणि गाड्यांचा वापर करतात.

सायप्रस
रेल्वेचे जाळे सायप्रस देशातही नाही. जरी रेल्वेचे जाळे 1950 ते 1951 च्या दरम्यान विकसित झाले असले तरी, गरीब आर्थिक परिस्थितीमुळे ते पुढे नेले जाऊ शकले नाही.

कुवेत
कुवेत हा श्रीमंत देशांपैकी एक आहे, जिथे संसाधने आणि पैशांची कमतरता नाही, परंतु रेल्वे लाइन नाही. देशात तेलाचा मोठा साठा आहे.