Couple Romantic Video Viral : बाईकवरून प्रवास करताना काही जोडपे खुल्लम खुल्ला रोमान्स करत असल्याचे धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपासून उघडकीस आले आहेत. मध्यप्रदेशमध्येही एका जोडप्याने भररस्त्यात बाईकवरून जात असताना रोमान्स सुरु केल्यानं खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगडच्या दुर्ग येथील जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. रस्त्यावरून बाईकची सवारी करत असताना प्रेमीयुगुल बेभान होऊन रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या गंभीर प्रकाराची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली असून भर रस्त्यात रोमान्स करणाऱ्या प्रेमीयुगुलांना अटक केलीय. जोडप्याने ज्या बाईकवरून प्रवास केला, ती बाईक चोरीची असल्याची महिती पोलीस तपासात समोर आली.

तरुणी बाईकच्या टाकीवर बसून तरुणाला घट्ट पकडून बसली अन्…

बाईकवरून जात असताना तरुणीने वाहनचालकाला मिठी मारली असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना दोघंही बेभान होऊन रोमान्स करताना दिसत आहेत. तरुण बाईक चालवत असताना तरुणी टाकीवर बसून तरुणाला घट्ट पकडून बसली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही बेड्या ठोकल्या.

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Girls fight Video
तुफान राडा! भर रस्त्यात मुलींची दे दणादण हाणामारी; लाथा-बुक्क्यांनी मारलं, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन्… Video व्हायरल
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

नक्की वाचा – Video : ‘बेशरम रंग’ गाण्यावर मराठी अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये थिरकली, बोल्ड अदांनी नेटकऱ्यांना केलं घायाळ

इथे पाहा व्हिडीओ

हे जोडपं भर रस्त्यात रोमान्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीय. आरोपी ज्या बाईकने प्रवास करत होते, ती बाईक चोरीची असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. बाईकवर अधिकृत नंबर प्लेट लावलेली नव्हती. १.५० लाख किमतीची बाईक एका वर्षापूर्वी चोरी झाली होती. कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय आरोपीने ९००० रुपयांना ही बाईक खरेदी केली होती. पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी दिलीय.