एकतर्फी प्रेमातून आत्महत्या, घरच्यांच्या विरोधामुळे आत्महत्या, वैवाहिक जिवनातील मानसिक त्रासामुळे आत्महत्या अशा बऱ्याच घटना आपण रोज एकत असतो पाहत असतो. आजकालची तरुण पिढी सहज एकमेकांच्या प्रेमात पडून एकमेकांना सर्वस्व अर्पण करते, असं करताना ते कोणताच विचार करत नाही. मग काही अडचणी आल्या की ते थेट आत्महत्येचं पाऊल उचलतात. मग विष पिऊन आत्महत्या करणे, गळफास लावून घेणे, रेल्वेखाली उडी मारणे अशा घटना आपण पाहिल्या आहेत. त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. कोलकाता येथील प्रेमी युगलाच्या आत्महत्येचा सीसीटिव्ही फूटेज सध्या सोशल मीडयावर तुफान व्हायरल होतेय. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

प्रेयसीला मिठी मारत मेट्रोखाली मारली उडी

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा भयावह व्हिडीओ एका प्रेमी युगुलाचा आहे ज्यांनी आत्महत्या करण्यासाठी मेट्रो ट्रॅकवर उडी मारली होती.हा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोलकाता मेट्रोच्या नोआपारा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेन येताना पाहून एका व्यक्तीने आपल्या प्रियसीला मिठी मारली आणि तिच्यासोबत ट्रॅकवर उडी मारली.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे जोडपे एकत्र स्टेशनवर फिरत असल्याचे दिसून येते. त्याचवेळी ट्रॅकवरुन मेट्रोही वेगाने पुढे येत आहे, मेट्रो येताच या व्यक्तीने आपल्या प्रेयसीसह मेट्रोखाली उडी मारली.

a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Zookeeper takes on lion in epic tug of war
Viral video: प्राणीसंग्रहालयात सिंहाबरोबर रस्सीखेच खेळतोय हा व्यक्ती! कोण जिंकलं ते व्हिडीओमध्ये बघा
When Russian Girl Came To Meet Dolly Chaiwala and request him in bill gates style one chai please
रशियन मुलीला पडली डॉलीच्या चहाची भूरळ, बिल गेट्सच्या स्टाइलमध्ये म्हणाली “वन चाय प्लीज”; पाहा Video

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – भेळ खाताना दहा वेळा विचार कराल! हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले

व्हिडिओ पाहून क्षणभर असे वाटते की, या अपघातात पुरुष आणि महिला दोघांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, तसे झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो कर्मचाऱ्यांनी या जोडप्याची सुटका केली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी ६.३४ वाजता घडली, त्यामुळे कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तासाभरात सेवा पुन्हा सुरू झाल्या. सध्या या दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.