scorecardresearch

Video: दुचाकीवरून आई-वडील खाली पडले, पण टाकीवर बसलेला लहान मुलगा अर्धा KM पर्यंत तसाच पुढे जातो अन्…

दाम्पत्य दुचाकीवरून खाली पडल्यानंतर रस्त्यावरून वाहने भरधाव वेगानं जात होती, तितक्यात…

Video: दुचाकीवरून आई-वडील खाली पडले, पण टाकीवर बसलेला लहान मुलगा अर्धा KM पर्यंत तसाच पुढे जातो अन्…
महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात. (image- twitter)

Bike Accident VIral Video : महामार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनांचे भीषण अपघात कॅमेरात कैद झाल्यावर सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अंगवर काटा येईल, अशाप्रकारच्या अपघाताच्या घटना घडलेल्या आपण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून पाहिल्या आहेत. अशाच प्रकारचा एका अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. अंगवार शहारा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दुचाकीवरून आपल्या लहान बाळासोबत प्रवास करणारं एक दाम्पत्य महामार्गावर अचानक खाली पडतं आणि त्यांच्यासोबत असलेला चिमुकला अर्धा किलोमीटरुपर्यंत धावत्या दुचाकीसोबतच जातो. त्यानंतर जे घडलं, ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

कारच्या डॅशबोर्ड कॅमेरात कैद झाला अपघाताचा संपूर्ण थरार

एका युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओत रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारच्या डॅशबोर्ड कॅमेरात कैद झाला आहे. एक कपल दुचाकीवरून भरधाव वेगानं जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. या दुचाकीवर एक दाम्पत्य आणि लहान मुलगा बसला आहे. रस्त्यावरून जात असताना एका स्कूटीची धडक लागल्यानंतर दुचाकीवर बसलेलं दाम्पत्याच नियंत्रण सुटतं आणि ते दोघेही भर रस्त्यात खाली पडतात.

नक्की वाचा – Cobra Viral Video: भर रस्त्यात नाग-नागिन चढली थेट सायकलवर, हनिमूननंतर मोठा फणा काढला अन् सायकलस्वाराने ठोकली धूम

इथे पाहा व्हिडीओ

लहान मुलगा दुचाकीवरून थेर सरळ पुढे जातो अन् तितक्यात…

आई-वडील हायवेवर खाली पडल्यानंतरही दुचाकीवर बसलेला लहान बाळ तसाच सरळ पुढे जातो. दोघांनाही खाली पडल्यावर गंभीर दुखापत होत नाही, पण त्यांच्या मुलगा दुचाकीवरून सरळ रेषेसारखा पुढे जातो. धक्कादायक बाब ही आहे की, दुचाकीच्या दोन्ही बाजूला रस्त्यावरून वाहनांचा प्रवास सुरु असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. असं असतानाही ती दुचाकी सरळ मार्गाने पुढे जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

दुचाकीचा वेग आपोआपच कमी झाला अन्…

देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात ना, ते सत्यच आहे. कारण भरधाव वेगानं जाणारी दुचाकी काही अंतरावर गेल्यावर वेग कमी झाल्यावर एका दुभाजकाजवळ जाऊन थांबते आणि लहान मुलगा दुभाजकाच्या बाजूला असलेल्या गवतात पडतो. त्या मुलाचे आई-वडीलही या अपघातात जखमी होत नाहीत आणि लहान मुलाचाही जीव वाचतो. त्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी होते आणि लोक बाळाला उचलून घेतात. हा व्हिडीओ जूना असल्याचं बोललं जात आहे, पण सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 10:48 IST

संबंधित बातम्या