Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत एका कपलचा किस करतानाचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रो सोशल मीडिया असो किंवा दिल्ली सरकार असो चर्चेचा विषय ठरलं आहे. दिल्ली मेट्रो रील, कपल्सचा रोमान्स आणि तरुणींचा डान्स अशा अनेक गोष्टींमुळे कायम चर्चे असते. जगातच्या कोपऱ्यात काही घडो पण दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आज पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एका कपलचा व्हिडीओ गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे. दिल्ली मेट्रोमधील अजून एका कपलचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो रोमान्स करणारी कपल्स तुम्ही सर्वत्र पाहू शकता. हे प्रेमी युगल लोकांच्या नजरा चुकवून एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. असाच काहीसा प्रकार या मेट्रोमध्ये सुरू होता. व्हिडीओमध्ये धावत्या मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक कपल एकमेकांच्या अगदी जवळ मिठीत असताना दिसून येतं आहे. ते फक्त एकमेकांना मिठी मारत नाही तर ते सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. मात्र तरीही त्यांचं आजूबाजूला जराही लक्ष नाहीये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘हात कापून टाकेन,’ वरळी सी-लिंकवर रोखल्याने महिलेची पोलिसांना धमकी, म्हणाली ‘जा त्या नरेंद्र मोदींना…’

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईला जनाची नाही मनाचीही लाज उरलेली दिसत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी कसलाही विचार, लाज न बाळगता खुल्लम खुल्ला हे कपल अश्लील चाळे करताना दिसतात. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या आज खुलेआम होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. नेटकरीही संतप्त प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत. एकानं म्हंटलंय “मुलाला नाहीतर मुलीनं तरी भान राखायला हवं”, तर दुसरा युजर म्हणतो “हे रोजचंच झालं आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple kissing in delhi metro video viral on social media trending today couple romance on delhi metro srk
First published on: 25-09-2023 at 17:10 IST