Student Kissing Video: प्रेम ही भावना जगात सगळ्यात सुंदर आणि पवित्र मानली जाते. अगदी लहान वयात वा अगदी साठीच्या वयातही प्रेम होऊ शकतं. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं. आपल्या जोडीदाराला खास वाटावं म्हणून वेळोवेळी त्यांना आपल्या भावना व्यक्त करून दाखवणं सगळ्यांनाच आवडतं. पण या नादात अनेक जण आपल्या मर्यादा ओलांडतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात विद्यार्थी एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

हेही वाचा… VIDEO: टायरवर बसून भरत होता हवा, पण पुढच्याच क्षणी ‘असं’ काही झालं की माणूस हवेत उडून जमिनीवर आदळला

विद्यार्थ्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करत एका कोपऱ्यात एक कपल एकमेकांना किस करताना दिसतंय. किस करताना ते इतके बेधुंद झाले आहेत की, त्यांना आजूबाजूचं भानच राहिलेलं नाहीय. कपलला पाहून तिथे असणारा सिक्युरिटी गार्ड हळूच पुढे जातो आणि त्यांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतो. त्यांचं लक्ष नाहीय याची खात्री करीत तो अजून पुढे जातो आणि त्यांचे फोटोज काढतो. त्या मुलाने पाहताच सिक्युरिटी गार्ड त्या दोघांना तिथून बाहेर यायला सांगतो.

व्हायरल झालेला हा व्हिडीओॅ @cheatingreels या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “allen student on weekend” (वीकेंडमध्ये अलेनचे विद्यार्थी) अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला १.९ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… ही कसली आई! चालत्या ट्रेनमध्ये मुलाच्या आयुष्याशी खेळली अन्…, पाहा महिलेचा थरारक VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “भारत एक अशी जागा आहे, जिथे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लघवी करू शकता; परंतु सार्वजनिक ठिकाणी किस नाही करू शकत.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “संमतीशिवाय रेकॉर्डिंग करताय?” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “व्हिडीओ बनवायची काय गरज होती?” “विद्यार्थी शिकायला येतात की, हे सगळं करायला येतात.” अशी कमेंट एकाने केली. तर एक युजर कमेंट करत म्हणाला, “असं लज्जास्पद कृत्य सार्वजनिक ठिकाणी करताना यांना काहीच कसं वाटत नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple kissing video viral obscene video of students viral on social media dvr