scorecardresearch

Video : मालदिव्हच्या पाण्यात केलं ‘अंडर वॉटर किस’, त्या कपलने थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला, कारण…

जुना विक्रम मोडीत काढून त्या कपलने नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली, पाण्यातील व्हिडीओ पाहून थक्क व्हाल.

Couple Sets Guinness World Record
अंडर वॉटर किस करुन कपलने केला विश्वविक्रम. (Image-Graphic Team)

Guinness World Records : व्हॅलेंटाईन वीक सुरु झाल्यापासून प्रेमीयुगुलांनी प्रेम व्यक्त करण्यासाठी नवनवीन प्लॅन तयार केले. कुणी गुलाबाचा फुल हातात घेऊन प्रपोज करण्याचा प्रयत्न केला असेल, तर कुणी कविता म्हणून, तर कुणी शायर झाला असेल. पण एका कपलची प्रेमकहाणीच जगावेगळी आहे. कारण या कपलने व्हॅलेंटाईन डे एकदम हटके साजरा केला अन् थेट विश्वविक्रमालाच गवसणी घातली. या कपलने पाण्यात ४ मिनिट ६ सेकंदांपर्यंत चुंबन करून गिनीद वर्ल्ड रेकॉर्ड केला. मालदिव्हच्या एका हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये या कपलने केलेल्या अनोख्या प्रेमाची विश्वविक्रमाच्या यादीत नोंद झालीय. दक्षिण आफ्रिकेतील बेथ नीले आणि कॅनडातील माईल्स क्लाउटीयर हे कपल पाण्यात डायविंग करण्यात माहीर आहेत. ते त्यांच्या मुलीसोबत दक्षिण आफ्रिकेत राहतात.

गिनीज वर्ड रेकॉर्डमध्ये ३ मिनिटे आणि २४ सेकंद अंडर वॉटर किस केल्याची याआधी नोदं होती. १३ वर्षांपूर्वी एका इटालियन शोमध्ये या गिनीज वर्ड रेकॉर्डची नोंद करण्यात आली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या या कपलने हा जूना विक्रम मोडीत काढला आहे. कपलने व्हॅलेंटाईन डेला नवीन व्रिक्रम केल्याचा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओता कॅप्शन देत म्हटलंय, महासागराच्या पाण्यावर प्रेम करणाऱ्या या कपलने अंडर वॉटर किस करण्याचा नवीन विक्रम केला आहे.

नक्की वाचा – Viral Video: तरुणाला अतिघाई नडली, भर वर्गातच तरुणी भिडली, व्हॅलेंटाईन डे आधीच प्रपोज केला अन्…

इथे पाहा व्हिडीओ

विश्वविक्रम मोडण्यासाठी या कपलने प्रयत्नांची पराकाष्टा केली. पाण्यात ब्रिथ होड्ल वॉर्म अप्सचा सरावही त्यांनी केला. २ ते ३ मिनिटं अंडरवॉटर किस करण्याचा सराव झाल्यानंतर त्यांनी विश्वविक्रम मोडण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेतील बेथ चारवेळा फ्रिडाईव चॅम्पियन राहिला आहे. आम्ही सराव केला नसता आणि या क्षेत्रात प्रोफेशनल नसतो, तर कदाचित आमच्यासाठी हे खूप कठीण झालं असंत, अशी प्रतिक्रिया या कपलने माध्यमांशी बोलताना दिलीय. इंटरनेटवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 11:05 IST