Couple yoga viral: भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. अनेकदा लोकांना योगा करण्याचा सल्लाही दिला जातो. दरम्यान एका जोडप्याचा योगा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक जोडपी एकत्र योगा करताना दिसत आहेत. ही जोडपी चक्क एकमेकांना मिठी मारून बसत हा योगा करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा योगा कुठल्या प्रकारचा आहे, असा सवाल सगळेच करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक लोक आपल्या पार्टनरसोबत योगा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्याचकीत झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारचे प्रश्न विचारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dhakadgirl8 नावाच्या युजरने शेअर केला आहे.व्हिडिओ शेअर करताना यूजरने लिहिले की, ‘कोणी सांगू शकेल का हा कोणत्या प्रकारचा योग आहे?’ हा व्हिडिओ आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांनी शेअर केला आहे. त्याचवेळी, लोक पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हीही कदाचीत हा योगा याआधी पाहिला नसेल.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Viral video JCB worker made little boys day remember
“कोणाच्या तरी हसण्याचे कारण बना” खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू; VIDEO एकदा पाहाच
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

हा कोणता योगा?

हा व्हायरल होणारा व्हिडीओ फेक नसून हा एका योगाचाच भाग आहे. व्हिडीओमध्ये कपल जो योगा करत आहेत त्याला गर्भधारणेदरम्यानचा योगा म्हणतात. हा योगा जास्त करुन परदेशात पाहायला मिळतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील मोठ मोठ्या शहरांमध्येही याचे क्लासेस घेतले जातात. ज्यामध्ये गर्भवती महिलांसोबत त्यांचे पार्टनर या योगा क्लासमध्ये येतात. जिथे त्यांना आपल्या गर्भवती बायकोला मानसिक आणि शारीरिकरित्या योगाच्या माध्यमातून सांभाळलं पाहिजे हे शिकवलं जातं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हे प्रभु हरे राम कृष्ण जगन्नाथ ये क्या…! वऱ्हाड्यांनी लग्नातच पेटवली शेकोटी; VIDEO पाहून तुम्हीही गारठाल…

व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून व्हिडिओवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा कसला योगा आहे?’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘याआधी या योगाबद्दल कधीच ऐकले नव्हते.