Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशाच चौरट्यांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश करत लाखो रुपयांचे दागीणे आणि रोख रक्कम लंपास केलीय.चोर अनेकदा ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर नजर ठेऊन असतात, आणि संधी मिळाली की हात साफ करुन घेतात. अशाच एका चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर होतोय.एका महिलेनं सोनारासमोरच ६ लाख रुपयांचा हार लंपास केला, आणि तरीदेखील त्याला काहीच समजलं नाही.

महिला निघून गेल्यानंतरच दुकानात चोरी झाल्याचं लक्षात आलं. आणि मग पोलिसांच्या मदतीनं गोंधळ उडाला. चोरी कशी झाली हे तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता. महिलेची चलाखी पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये घडली आहे. तर झालं असं की, एक जोडपं दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोनाराच्या दुकानात आलं. त्यानंतर दुकानदार या जोडप्याला वेगवेगळे दागिने दाखवू लागतो. याचवेळी ही महिलेनं मोठ्या चलाखीनं एक दागिन्यांचा सेट गुपचूप पदराखाली लपवला, आणि मग डिझाइन आवडलं नाही असं सांगत दोघं तिथून निघून गेले. महिलेनं दुकानदाराच्या डोळ्यांसमोरच ६ लाख रुपयांचा हार गायब केला, आणि त्याला काहीच समजलं नाही. पोलिस सध्या या कपलचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ते सीसीटीव्ही फुटेज तपासून दरोड्यात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्वेलर्सच्या दुकानात वरचेवर चोरीच्या घटना घडत असतात. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं चोरी करण्याचा प्रयत्न चोर करतात.हा व्हिडीओ @@KAUSHIK_HINDTV या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत