Couple Video Viral: प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं असं अनेकांना वाटत असतं.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल चक्क भरकॉन्सर्टमध्ये किस करताना दिसत आहेत.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

हेही वाचा… “अरे घूस, काही नाही करत”, मित्राच्या सांगण्यावर आत गेला, पण बैलाच्या तावडीत सापडला; VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…

भरकॉन्सर्टमध्ये कपलचे अश्लील चाळे

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. एका ठिकाणी कॉन्सर्ट सुरू असताना भरगर्दीत एक कपल अश्लील चाळे करताना दिसत आहे. हजारोंच्या संख्येने या कॉन्सर्टमध्ये माणसं जमलेली दिसत आहेत. सगळेच आपल्या फोनमधून कॉन्सर्टचा व्हिडीओ काढण्यात मग्न आहेत. पण, यादरम्यान गर्दीचा फायदा घेत एक कपल किस करताना दिसतायत.

आजूबाजूचं भान न ठेवता हे कपल आपल्याच धुंदीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी भरगर्दीत या कपलचा अश्लीलपणा सुरू आहे.

हा व्हायरल व्हिडीओ @khairahmed007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

हेही वाचा… मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

कपलचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एका कॉन्टेन्टसाठी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका” तर दुसऱ्याने “कॅमेरा मॅनने अगदी योग्य ठिकाणी फोकस केला आहे,” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “तुम्हाला इतरांचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा कोणताही अधिकार नाही”, तर “व्हिडीओ अपलोड करण्यापूर्वी तुम्ही त्यांच्याकडून संमती घेतली आहे का?” असा प्रश्न एकाने विचारला.

“रिलीज न झालेला चित्रपट लीक झाला?”, “यांना कसलं भानच नाही”, “तुम्ही व्हिडीओ का रेकॉर्ड केलात! तुम्ही त्यांना ओळखता का? तुम्ही त्यांच्या परवानगीने हे पोस्ट केले आहे का?”, “मौके पे चौका” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.

Story img Loader