Viral video: एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे पण कधीतरी ते सापडतातच. अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक जोडपं ट्रेनच्या खाली रेल्वे रुळावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. याच वेळी ट्रेन सुरु होते आणि पुढे काय घडतं तुम्हीच पाहा…

या व्हिडिओमध्ये आपल्याला रेल्वे रुळावरील एक दृष्य दिसेल. रुळावर एक रेल्वे थांबलेली असते आणि याच्याच खाली एक कपल बसलेलं असतं. ट्रेन आणि रुळाच्या मध्यभागी असलेल्या भागात ते ठाण मांडून बसतात आणि एकमेकांना प्रेम करु लागतात. दोघेही गप्पा मारतात, एकमेकांना मिठीत घेतात पण तितक्यातच रेल्वेचा हार्न वाजतो आणि ट्रेन पुन्हा सुरु होते. रेल्वेचा आवाज ऐकताच जोडपं भानावर येतं आणि आपला जीव वाचवण्यासाठी दोघेही ट्रेनखालून बाहेर निघतात. काही सेकंदाचा हा थरार अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतो. पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की, आता काय दोघं वाचत नाही पण वेळीच ट्रेनखालून पळ काढल्याने दोघेही सुखरुप या परिस्थितीतून बाहेर निघतात.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडिओ @Rudhrayadav001 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हे बघा एक मुलगा आणि एक मुलगी रेल्वे रुळाखाली प्रेम करण्यातइतके मग्न होते की त्यांना आपल्या जीवाचीही पर्वा नव्हती. सुदैवाने ट्रेनने वेळेवर हॉर्न वाजवला, नाहीतर एका छोट्या चुकीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला असता. अशी कृत्ये केवळ धोकादायकच नाहीत, तर त्यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो’.